Manganga Sugar Factory : माणगंगा कारखाना नेत्यांनी बंद पाडला अन् ताप जिल्हा बँकेला झाला!

Manganga Sugar Factory workers Issue : कामगारांचा पगार आणि थकीत रक्कम देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Manganga Sugar Factory
Manganga Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Sangali News : आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा माणगंगा सहकारी साखर कारखाना थकित कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. अनेक वर्षे कारखाना बंद राहिल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या एका नेत्याने चालवायला घेत हंगाम सुरु केला. मात्र तो तोट्यात चालल्याने पंधरा दिवसात तो बंद केला. त्यामुळे कामगारांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली.

आता कारखाना सुरु करुन कामगारांची देणी देण्याच्या मागणीसाठी कामगार जिल्हा बँकेच्या दारात बसले. त्यामुळे नेत्यांनी बंद पाडलेला कारखान्याचा ताप बँकेला चांगलाच झाल्याचे स्पष्ट झाले.

'माजी आमदार देशमुख यांचा सहकारातील माणगंगा कारखाना(Manganga Sugar Factory) मागील तीन वर्षांपासून बंद आहे. यामुळे कामगारांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. सर्व कामगार कर्मचारी गेली तीस वर्षे काम करीत असून त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आम्हा कामगारांची देणी थकीत झाली. त्यामध्ये कामगारांचा कोणताही दोष नाही.

सध्या कारखाना थकीत कर्जासाठी सिक्युरिटायझशन, अ‍ॅक्टनुसार जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे आमची थकीत असणारी देणी कधी व केव्हा मिळणार याबाबत आमच्या कामगारांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.' असं कामगारांकडून सांगण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manganga Sugar Factory
Solapur Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीत सग्या-सोयऱ्यांचाच भरणा...पंढरपुरात पवारांचे निष्ठावंत दूर!

गतवर्षी कारखान्याच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या एका नेत्याने माणगंगा कारखाना चालवून दाखवू, असे सांगत निवडणुकीत माजी आमदार देशमुख यांच्यावर बाजी मारली होती. कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्याला थोडेफार यशही आले. मात्र पंधरा दिवस गाळप झाल्यानंतर तोटा वाढत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिंदे गटाच्या(Eknath Shinde) नेत्याने कारखाना तोट्यात चालल्याने बंद केला. या कारणांनी कामगारांचा पगार आणि थकीत रक्कम देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कामगारांचा थकीत पगार देण्यात यावेत. प्रॉव्हिडंड फंड त्वरीत भरावी. सेवानिवत्त कामगारांची ग्रॅज्युईटी जमा करावी. थकीत बोनस, ओव्हरटाईमची रक्कम देण्यात यावी. कारखान्याने कामगारांचे नावे कर्ज काढलेले त्वरित भरावीत, अशी मागणी जिल्हा बँकेकडे कामगारांनी केली आहे. कारखाना भाडेत्तवावर एखाद्या कंपनीस चालवावयास देवून थकित देणी देण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी बँकेची आहे. कर्मचार्‍यांचा अंत पाहू नका. असा इशारा कामगारांनी दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Manganga Sugar Factory
Udayanraje Bhosale News : मराठा आरक्षणाची लढाई जिंकताच उदयनराजे भोसलेंची मोठी मागणी; म्हणाले, 'बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com