Manoharmama Bhosale : मनोहरमामाचा कारनामा : भाविकांना लावला 3 कोटींचा चुना; घोटीचा आश्रम सील, गाणगापूर, कोल्हापुरातून महत्वाची कागदपत्रे जप्त...

Solapur Crime News : भोंदू मनोहरमामा भोसले याच्याविरोधातील तपासात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. महिलांची फसवणूक आणि कथित लैंगिक शोषणप्रकरणी पोलिसांचा तपास अधिक व्यापक झाला आहे.
Manohar Mama Bhosale
Manohar Mama BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 July : बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगून लोकांना फसविणारा, महिलांचे शारीरिक शोषण करणारा भोंदू मनोहरमामा भोसले याचे नवे कारनामे उजेडात येत आहेत. किडनीचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उजेडात आली होती. आता पोलिसांत तपासून धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

मनोहर भोसले याने आतापर्यंत भाविकांची तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील घोटी (ता. करमाळा) येथे आश्रम उभारून त्याठिकाणी त्याने हे प्रकार केले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

महिलांवर अत्याचार, अडचणीतील लोकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मनोहरमामा भोसले यास यापूर्वीच अटक केलेली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. दोन दिवसांपूर्वी एका ३५ वर्षीय महिलेने किडनीचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची तसेच, तब्बल ९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. त्यासंदर्भात पोलिस अधीक्षकांनी माध्यमांशी संवाद साधला.

पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, ‘मनोहरमामा हा भोंदू आहे, त्याचा घोटी येथील आश्रम अनधिकृत असून तेथील ग्रामपंचायतीने देखील तसे म्हटले आहे. पोलिसांनी तो आश्रम सील केला आहे. गाणगापूर, कोल्हापूर येथील त्याच्या आश्रमात आमची टीम जाऊन आली आहे. त्याठिकाणी आम्हाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याच्या तपासासाठी पाच अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे.

Manohar Mama Bhosale
Ashadhi Wari : पंढरपुरातील मंत्र्यांच्या आढावा बैठकांना आता लगाम; मुख्यमंत्री कार्यालयातूनच सूत्रं हलणार

मनोहर भोसले हा अडचणीतील लोकांना आमवस्येच्या दिवशी पुजा करायला सांगत होता. त्यासाठी तो सुरुवातीला २१ ते ५१ हजार रुपयांची पावती करीत होता. त्यानंतर तो पुजा करताना, पुजा करून झाल्यावर तो आणखी पैसे घेत होता, असेही पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Manohar Mama Bhosale
Solapur Corporation : सोलापूर महापालिकेत अंधाधुंद कारभार : अधिकारीच बनले ठेकेदार, धर्मगुरु अन्‌ थर्ड पार्टी एजन्सीचा सर्वेसर्वा

दरम्यान, मनोहरमामाने आणखी कोणाची फसवणूक केली असेल, कोणावर अत्याचार केला असल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहनही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com