Local Body Election: आखाडा मिनी मंत्रालयाचा! मांगले जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी; दोन नाईकांचे अस्तित्व पणाला

Sangli Local Body Politic's Former MLA Mansingrao Naik Shivajirao Naik : मांगले जिल्हा परिषद मतदार संघ शिराळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असून या वेळी पक्षापेक्षा अस्तित्व टिकवण्यावर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा भर असणार आहे.
Sangli Local Body Politic's Ajit Pawar,  Sharad Pawar, Shivajirao Naik And Former MLA Mansingrao Naik
Sangli Local Body Politic's Ajit Pawar, Sharad Pawar, Shivajirao Naik And Former MLA Mansingrao Naik sarkarnama
Published on
Updated on

मांगले जिल्हा परिषद गट : भगवान शेवडे

मांगले जिल्हा परिषद मतदार संघ शिराळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. पण या वेळी पक्षापेक्षा अस्तित्व टिकवण्यावर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा भर असणार आहे. विधानसभा निवडणुकीत गावातील मतदान ज्या उमेदवाराला अधिक, त्याचा विजय निश्चित, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांच्यातील एकीनंतर जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत. पण नुकसाच जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली असून शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत दोन नाईकांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. पण पक्ष वेगळे असलेतरी अस्तित्वाच्या लढाईत नेमकी राजकीय समीकरणे कशी असणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

विश्वासराव नाईक साखर कारखान्यानजीक असणाऱ्या मांगले मतदार संघात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कुटुंबातील सदस्याला आतापर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळाले आहे. दोन नाईकांची स्थानिक पातळीवर युती होणार की आघाडी धर्म पाळून भाजप आमदार सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे ॲड. भगतसिंग नाईक एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विरोधात उमेदवार देणार का? हे पाहावं लागणार आहे.

या निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी कोणताही निर्णय अंतिम टप्प्यात होऊ शकतो. गत निवडणुकीतील मित्र या निवडणुकीत राजकीय शत्रू म्हणून एकमेकांसमोर उभे राहण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय. गत निवडणुकीत आघाडी धर्म पाळत माजी आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख यांनी भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्याविरोधी उमेदवार दिले होते.

Sangli Local Body Politic's Ajit Pawar,  Sharad Pawar, Shivajirao Naik And Former MLA Mansingrao Naik
Local Body Elections : शरद पवार, ठाकरे अन् काँग्रेसचा विचार पक्का, पण एकच गोष्ट ठरतेय अडथळा...

आमदार नाईक यांच्या गटातून अनन्या वीरेंद्र नाईक, तर मानसिंगराव नाईक यांच्या गटातून अश्विनी राजेंद्र नाईक यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांच्या गटाच्या अश्विनी नाईक विजयी झाल्या होत्या. मांगले पंचायत समिती मतदार संघात काँग्रेसच्या मायावती कांबळे यांच्या विरोधात भाजपच्या निशा मोहिते यांना उमेदवारी मिळाली होती. यामध्ये काँग्रेसच्या मायावती कांबळे विजयी झाल्या होत्या.

यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे चित्र असले तरी ऐनवेळी वरच्या राजकारणाचा विचार न करता स्थानिक पातळीवर अस्तित्व राखण्यासाठी तडजोडी करण्यासाठी गावपातळीवरील नेत्यांसह प्रमुख पक्षीय नेत्यांनी आतापासून कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. या पाठीमागील राजकारणात एकमेकांची जिरवाजिरवी करण्यात गट संपुष्टात आले आहेत. यापुढे तडजोडीचे राजकारण करण्यासाठी नेत्यांचे गुफ्तगु सुरू आहे. कोणत्याही राजकीय गटातून उमेदवारांच्या नावाची चर्चा अद्यापपर्यंत तरी नाही, असली तरी ती बंद दाराआड सुरू आहे.

Sangli Local Body Politic's Ajit Pawar,  Sharad Pawar, Shivajirao Naik And Former MLA Mansingrao Naik
Local body election : सांगलीच्या सत्तेची चावी खानापुर तालुक्याकडे? प्रभाग रचनेनुसार एक गट आणि दोन गणांची वाढ

मांगले जिल्हा परिषद गट असा

मांगले जिल्हा परिषद गटांतर्गत मांगले व देववाडी हे दोन गण आहेत. देववाडी गणात जांभळेवाडी, रेड, खेड, भटवाडी, बेलदारवाडी, देववाडी, कापरी, शिवणी, लादेवाडी, चिखलवाडी, इंग्रुळ या गावांचा समावेश आहे. मांगले गणात मांगले, कांदे, फकीरवाडी या गावांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com