Maratha Reservation: भुजबळ OBCसाठी लढतात, मग चंद्रकांतदादा गप्प का? मराठा समाज आक्रमक

Maharashtra Politics: उपसमितीचे अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांचा कोणताच सहभाग दिसत नाही...
Chhagan Bhujbal, Chandrakant Patil
Chhagan Bhujbal, Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur: कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला तात्पुरती असहमती दर्शवली. मात्र कोल्हापूर मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी एक वेगळीच मागणी करत सरकारला धारेवर धरलं आहे. मराठा आरक्षण बाबत ठोस निर्णय घेण्यात उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अक्षम ठरल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये उपसमितीचे अध्यक्ष असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोणताच सहभाग दिसत नसल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.

Chhagan Bhujbal, Chandrakant Patil
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी मराठा नेत्यांचे कान उपटले; नेत्यांनी मराठ्यांना वंचित ठेवलं!

सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरक्षणाचा लढा सुरू आहे. याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढत अधिसूचना प्रारूप जाहीर केले. वास्तविक मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने उपसमिती नेमली असून त्याचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. राज्यसरकारच्या या प्रक्रियेत चंद्रकांत पाटील आहेत कुठे? परंतु आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ते कोठेही दिसले नाहीत. याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. ते या प्रश्नी निष्क्रिय ठरल्याने यापूर्वीही राजीनाम्याची मागणी मराठा समाजाने केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे राज्यातील सत्तेतील मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या आंदोलनावर टीका करताना दिसतात. त्यांनी सडेतोड बोलत इतर मागासवर्गीयांच्यां हक्कासाठी लढत आहेत. पण चंद्रकांत पाटील मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष असून ते गप्प का? त्यांना या समितीवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com