
थोडक्यात बातमीचा सारांश :
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे पुन्हा एकदा भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
यावेळी मोर्चासाठी सरळ रस्ता निवडला असून, प्रवासादरम्यान शिवनेरी गडाचे दर्शन घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले, कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीचे आशीर्वाद घ्यायचे आहेत.
जरांगे पाटील यांनी आपल्या तब्येतीबद्दल भावनिक वक्तव्य केले, "मी मराठ्यांचा थोड्या दिवसांचा पाहुणा आहे" असे म्हणत आणि मराठ्यांना आरक्षणाचा गुलाल पाहण्याची इच्छा व्यक्त करत, माघारी येण्याबद्दल अनिश्चितता दर्शवली.
Pune News : मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाने पुन्हा एकदा एल्गार केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात 'मुंबईकडे मोर्चा' काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या मार्गाबाबत जरांगे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना माहिती दिली. तसेच सरकारला इशारा देताना जोरदार टीकास्त्र डागले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. (Manoj Jarange Patil leads emotional march from Shivneri to Mumbai for Maratha reservation on August 29)
मनोज जरांगे पाटील म्हणाले, या वेळी पहिल्यापेक्षा पाचपट अधिक संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी होणार आहे. मोर्चा आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट, कल्याण, चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार आहे. या वेळी शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढील प्रवास सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, "गेल्यावेळी लोणावळ्या मार्गे मोर्चा होता, मात्र यंदा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट, कल्याण, ठाणे, चेंबूर मार्गे आझाद मैदानात मोर्चा पोहोचणार आहे." हा मार्ग निवडण्यामागे कोणतेही राजकारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील वेळी त्या मार्गे गेलो होतो आता या मार्गे जावं अशी या भागातील लोकांची मागणी होती.
"कल्याण मार्ग जवळचा आहे म्हणून तो निवडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातून मोर्चा नेतो म्हणून कोणाला टार्गेट करत नाही. असे आपण छक्के पंजे खेळत नाही. असंही स्पष्टीकरण जरांगे पाटील यांनी दिलं आहे.
“मी पाहुणा आहे, माझे शरीर साथ देत नाही”
मोर्चासाठी आम्ही सरळ रस्ता निवडला आहे.” मुळात आम्हाला शिवाजी महाराजांच्या पवित्र शिवनेरी गडाचे दर्शन घ्यायचं आहे. त्या ठिकाणची माती कपाळाला लावायची आहे. कारण परत आलो नाही तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईन. कारण माझे शरीर साथ देत नाही”, “मी मराठ्यांचा थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. मला मराठ्यांच्या अंगावर शंभर टक्के गुलाल फेकायचा आहे. परत माघारी येईन की नाही याची खात्री नाही.” असं भावनिक वक्तव्य जरांगे यांनी केलं
मुख्यमंत्र्यांवर वर टीका
मराठा जात प्रमाणपत्र वैधतेबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय शिरसाट यांना मराठा प्रमाणपत्राची वैधता रोखण्याचे आदेश दिले," असा गंभीर आरोप त्यांनी केला. “मला मिळालेली माहिती खरी आहे. असे चाळे थांबवा. प्रमाणपत्रे रोखून धरू नका, वेळ वाईट येईल,” असा थेट इशाराच त्यांनी फडणवीस यांना दिला.
1. मराठा आरक्षणासाठी मोर्चा कधी आणि कुठे जाणार आहे?
हा मोर्चा 29 ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावरून सुरू होणार असून मुंबईकडे नेण्यात येणार आहे.
2. मनोज जरांगे पाटलांनी काय भावनिक वक्तव्य केलं?
"मी मराठ्यांचा थोड्या दिवसांचा पाहुणा आहे", "परत आलो नाही तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईन" असे भावनिक शब्द त्यांनी वापरले.
3. मोर्चाच्या मागील उद्देश काय आहे?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. हे आंदोलन अंतिम टप्प्यात आहे, असेही संकेत दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.