Maratha Reservation : सोलापुरात मराठा आंदोलकाची प्रकृती खालावली

Solapur Hunger Strikers : सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बी. बी. दारफळ येथे मराठा बांधवांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे
Maratha Hunger Strikers
Maratha Hunger StrikersSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. ३० ऑक्टोबर) बेमुदत उपोषण करणाऱ्या दोघांपैकी एका आंदोलकाची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर उपोषणस्थळीच वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Maratha Reservation : Maratha protester condition deteriorated in Solapur)

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून आंदोलन, उपोषण केली जात आहेत. सोलापुरातही प्रशांत देशमुख आणि प्रकाश डांगे हे दोघे सोमवारपासून (३० ऑक्टोबर) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तसेच, या बेमुदत उपोषणस्थळी राजकीय नेते-पदाधिकारी भेटी देतात. शहर आणि जिल्ह्यातील लोक या उपोषणात सहभागी होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Hunger Strikers
Belgaum Black Day : मुख्यमंत्र्यांच्या मोठं बोलण्याला ठाकरे बाणा पडला भारी...

या उपोषणाला शहर आणि जिल्ह्यातून सक्रिय पाठिंबा मिळत आहे. शहरातून विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव उपोषणस्थळी उपस्थिती लावत आहेत. जिल्ह्यातून काही समाज बांधव उपोषणात सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवित आहेत. राजकीय नेत्यांचा यामध्ये सहभाग असतो.

सोलापूर शहरातील सर्वपक्षीय नेते आज उपोषणस्थळी दाखल झाले होते. या सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन सुरू होतं. त्याच वेळी उपोषणकर्ते प्रशांत देशमुख यांची प्रकृती खालावली. गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी पाण्याचा थेंबही घेतलेले नाही. त्यामुळे आंदोलन सुरू असतानाच उपोषणकर्ते प्रशांत देशमुख यांची प्रकृती खालावली.

प्रशांत देशमुख यांना भोवळ आली होती. त्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचाराला सुरुवात केली. उपोषणस्थळीच त्यांच्यावर वैद्यकीय उपचाराला सुरुवात करण्यात आली आहे. देशमुख यांना सलाइन लावण्यात आले आहे. सध्या देशमुख यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Maratha Hunger Strikers
Maratha Reservation Protest : ...तर सरकारविरोधात 'काळी दिवाळी' साजरी करू; मराठा आंदोलकांचा इशारा!

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बी. बी. दारफळ येथे मराठा बांधवांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. गावातील महात्मा गांधी तलावात उतरून तरुणांनी हे आंदोलन केले. आरक्षण मिळेपर्यंत या गावातही उपोषण आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे.

Maratha Hunger Strikers
Eknath Shinde Group News आमदार सुहास कांदे यांना शिंदे सरकारचा जोरदार धक्का!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com