Shivsena Eknath Shinde Group News : मनोज जरांगे पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या महाअधिवेशनात या विषयावर चर्चा झाली. आमदार सुहास कांदे यांनी याबाबतचा ठराव मांडला.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात यावे. हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे. याबाबत यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीतील ठरावाची शनिवारी कोल्हापूर येथे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाच्या बैठकीत पुनरावृत्ती झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या महाअधिवेशनात आमदार सुहास कांदे यांनी याबाबत ठराव मांडला. त्याला भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी अनुमोदन दिले. आमदार कांदे यांनी हा ठराव महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. त्यामुळे हा ठराव एकमताने मंजूर करण्याचे आवाहन या वेळी केले. ठराव मांडल्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी टाळ्यांच्या गजरात त्याला एकमताने मान्यता दिली.
या वेळी आमदार कांदे म्हणाले, 'या विषयावर काही नेते राजकारण करीत आहेत. त्यांच्या विविध विधानांमुळे जनतेचा बुद्धिभेद होत आहे. त्यामुळे हा ठराव अतिशय महत्त्वाचा आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात यावे, तसेच ओबीसी आणि अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे. शिवसेनेच्या महाअधिवेशनात याबाबतची मागणी राज्य शासनाला करण्यात येत आहे.'
ठराव मांडताना आमदार कांदे यांनी, 'काही नेते या विषयावर राजकारण करून जनतेचा बुद्धिभेद करीत आहेत' असे विधान केले. त्यामुळे मराठा आरक्षणावर राजकारण करणारे नेते कोण याची कुजबूज या अधिवेशनात सुरू होती. कांदे आणि राज्याचे अन्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिवसेना(Shivsena) शिंदे गटाच्या महाअधिवेशनात मराठा आरक्षणाचा ठराव मांडतानादेखील आमदार कांदे यांनी अप्रत्यक्षरीत्या मंत्री भुजबळ यांना लक्ष्य केल्याची चर्चा होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.