Manoj Jarange Patil News : मनोज जरांगेंच्या मागे कोण? महिला सरपंचांच्या वादग्रस्त पोस्टमुळे वातावरण पेटले...

Manoj Jarange Patil News : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
Manoj Jarange Patil News :
Manoj Jarange Patil News :Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह लेखन केल्याने नगरमधील वातावरण तापले आहे. शेंडी (ता. नगर) ग्रामपंचायत महिला सरपंचाने हे आक्षेपार्ह विधान केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil News :
NCP-BJP : राष्ट्रवादी आमदाराच्या मतदारसंघातील समस्या सोडवली भाजपच्या माजी आमदाराने!

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन उभे केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. आपले बेमुदत उपोषण आंदोलन राज्य सरकारच्या आश्वासनानंतर थांबवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहे.

मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाला विरोधासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर ओबीसी नेते देखील मैदानात उतरले आहे. मराठा आरक्षणामुळे राज्यातील ओबीसीतील समाज देखील सावध झाला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा समर्थन आहे. परंतु ओबीसीतून द्यायला विरोध आहे.

Manoj Jarange Patil News :
शाई हल्ल्यानंतर नामदेव जाधव यांची पहिली प्रतिक्रिया | Namdeo Jadhav ink attack |

यातून राज्यभर आता मराठा आणि ओबीसी असा संघर्ष पहायला मिळत आहे. हा संघर्ष आता गावपातळीवर पोहोचला आहे. त्याची पहिली ठिणगी नगर जिल्ह्यात पडली आहे. शेंडी (ता. नगर) येथील महिला सरपंचाने जरांगे पाटील यांच्या मागे कोण? या समाज माध्यमावर संदेशावर आक्षेपार्ह उत्तर दिले आहे. याप्रकरणी संबंधित महिला सरपंचाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीताराम दाणी (वय 43, रा. शेंडी, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समाज माध्यमावर शेंडी-पोखर्डी वार्ता नावाने ग्रुप आहे. या ग्रुपवर अक्षय भगत याने मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे? उत्तर मी, असे लिहिले आहे.

या पोस्टवर शेंडी गावच्या महिला सरपंच यांनी आक्षेपार्ह उत्तर लिहित पोस्ट शेअर केली आहे. महिला सरपंचांच्या या विधानामुळे मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे यांच्याविषयी अवमान करत आक्षेपार्ह विधान करून मराठा समाजाच्या दुखवल्या आहेत. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे हे विधान आणि कृत्य आहे, असे सीताराम दाणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com