
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
सत्ताधारी महायुतीतील एकही मंत्री त्यांच्या उपोषणाला भेट दिली नसल्याने रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
निवडणुकीच्या काळात अनेक मंत्री भेटायला यायचे पण आता कोणीही आलेले नाही, अशी रोहित पवारांची टीका आहे.
Mumbai News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून या दरम्यान महाविकास आघाडीतील अनेक नेते, खासदार आणि आमदार त्यांच्या भेटीला आझाद मैदानावर गेले होते. पण सत्ताधारी महायुतीतील एक देखील मंत्री पोहचलेला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जळजळीत टीका केली आहे. त्यांनी हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, संधी शोधतय, चुकुनही चूक करू नका, असे आवाहन मराठा आंदोलकांना केले आहे. तसेच निवडणुकीवेळी असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री जायचे. पण आता सरकारचा एक प्रतिनिधीही येथे गेला नाही, अशी टीका केलीय. दरम्यान आता जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी विखे पाटील यांच्या नेतृत्वात उपसमिती जाणार आहे. त्यांच्याबरोबर मंत्री शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे यांच्यासह काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित असतील.
गेल्या पाच दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मराठा आंदोलकही आझाद मैदैवर जमले आहेत. दरम्यान आज दुपारपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व रस्ते मोकळे करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावली असून मराठा आंदोलकही त्यांना सहकार्य करत आहेत.
दरम्यान रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी निवडणुका असताना जरांगे यांना भेटालया महायुतीचे 10-10 मंत्री जायचे. पण आता त्या मंत्र्यांना जरांगेंचा विसर पडला आहे. तेच काय तर सरकारचा एकही प्रतिनिधी आझाद मैदानावर गेलेला नाही. सरकारने मराठा आंदोलकांना वाऱ्यावर सोडल्याची टीका त्यांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यात आलेला नाही. मंत्री सोडा पण सरकारकडून एकही प्रतिनिधी गेलेला नाही. तोडगा काढण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. यामुळे सरकारची ही भूमिका योग्य आहे का? गेल्या वेळेस निवडणुका होत्या तेव्हा 10-10 मंत्री भेटीला जायचे आता मात्र या आंदोलकांना वाऱ्यावर सोडलय. एकीकडे आंदोलकांशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणूनबुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थाने रचायची, नेरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभतं का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच रोहित पवार यांनी, महायुतीचे हे सरकार गेंड्याच्या कातडीचं असून केवळ संधी शोधत आहे. त्यामुळे ‘चुकुनही चूक करू नका’ अशी आंदोलक युवांना विनंती केली आहे. सध्या सर्वांनी शांतता ठेवा, शांतता पाळा. सरकारेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करून तत्काळ तोडगा काढावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी, मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही. एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचं सोंग का घेत आहे? असाही सवाल केला आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार झाला असून मराठा आरक्षण उपसमितीने तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी नेला आहे. तसेच सरकारचे शिष्टमंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात ही आझाद मैदानावर पोहचले आहे. ज्यात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि उपसमितीचे सचिवांचा समावेश आहे.
प्र.१: मनोज जरांगे पाटील का उपोषण करत आहेत?
👉 मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते उपोषण करत आहेत.
प्र.२: उपोषणाचा आज कितवा दिवस आहे?
👉 आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
प्र.३: सरकारवर टीका कोणी केली?
👉 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
प्र.४: रोहित पवारांनी काय म्हटले?
👉 त्यांनी हे सरकार "गेंड्याच्या कातडीचं" असल्याचे म्हटले आणि आंदोलकांना आवाहन केले की चुकूनही चूक करू नका.
प्र.५: रोहित पवारांचा आरोप काय आहे?
👉 निवडणुकीच्या काळात मंत्री भेटायला येत होते, पण आता सरकारकडून कोणीही भेटीस गेलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.