Kolhapur News : भुजबळांविरोधात 'सकल मराठा' आक्रमक ; चक्क शेण चारून...

Kolhapur News : "आधीच मर्कट त्याच्यात मद्य प्याला..."
Kolhapur News
Kolhapur News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते व सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडीतील सभेत मराठा आरक्षणाला विरोध करत मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. जरांगे-पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या भुजबळांना आता कोल्हापुरातून चांगलेच उत्तर देण्यात आले आहे. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने भुजबळांच्या फोटोला शेण चारून निषेध केला आहे. मंत्री भुजबळसाहेब तुम्ही तोंडावर आवर घाला अन्यथा आगामी निवडणुकीत जनता तोंडात शेण घालेल, असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. (Latest Marathi News)

Kolhapur News
गावबंदीवरून भुजबळ आक्रमक ; बघा कोणाकोणाची घेतली नावं ? | Chhagan Bhujbal on Maratha Reservation |

सोमवारी भिवंडीत झालेल्या सभेत छगन भुजबळांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याला ठाम विरोध दर्शवला होता. यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. याचे पडसाद कोल्हापूरात उमटताना दिसले. कोल्हापुरातील सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला. दसरा चौकात छगन भुजबळ यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करून, त्यांचा निषेध करण्यात आला.

Kolhapur News
NCP Agitation : कर्जत-जामखेड 'MIDC' प्रस्ताव रद्द झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस राम शिंदेंविरोधात आक्रमक!

मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारला मनोज जरांगे-पाटील आणि सकल मराठा समाजाने 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. तरी देखील सत्तेत असलेले राष्ट्रवादी गटाचे मंत्री छगन भुजबळ हे सकल मराठा समाजाविरोधात वक्तव्य करत आहेत. भुजबळ दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने भुजबळांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला शेण चारण्यात आले.

"आधीच मर्कट त्याच्यात मद्य प्याला..."

मंत्री छगन भुजबळांनी भिवंडीतील सभेत जरांगे-पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. भुजबळ म्हणाले होते, 'बोलताना, जरांगे काहीही बोलतो. आमची लायकी काढतो. एक म्हण आहे. आधीच मर्कट आणि त्याच्यात मद्य प्याला. काहीही बोलतोय. आमची लायकी काढणारा तू कोण, अशी घणाघाती टीका भुजबळांनी केली. मनोज जरांगे पाटील सासरची भाकरी खातात, असा हल्लाबोल भुजबळांनी केला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com