Nagpur News: "एकाच वर्षात शेतकरी अवकाळी आणि दुष्काळी अशा दुहेरी संकटांचा सामना करीत आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी साधे निवेदन देखील केले नाही. मात्र सरकार सभागृहाचे कामकाज वेगळ्याच दिशेने रेटत आहे. विरोधकांचा आवाज दाबत आहे," असा घाणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.
नागपूर येथील अधिवेशनाचा काल पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी शेतकऱ्यांनी सरकारला धारेवर धरले. अवकाळी आणि दुष्काळामुळे वेढलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र अध्यक्षकांनी सभागृहाचे कामकाज रेटत विरोधकांची चर्चा करण्याची मागणी फेटाळली. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी विरेधकांनी स्थगन प्रस्ताव मांडून देखील सरकारने याकडे दुर्लक्ष केले. यानंतर सरकारने साधे निवेदन देखील केले नाही. सरकारच्या या भूमिकेवर आमदार बाळासाहेब थोरात चांगलेच संतापले.
आमदार थोरात म्हणाले, "अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यातील ९१ तालुक्यांमधील एक लाख हेक्टर पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची तीव्रता प्रचंड आहे. द्राक्ष आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंबा पिकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे". सरकार मात्र या सर्व बाबींवर चर्चा करायला तयार नाही. आज पंचनामे आणि मदतीची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अवकाळी पावसाला इतके दिवस उलटून गेले तरी अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतावर अद्यापपर्यंत प्रशासन पोहोचले नाही, पंचनामे पूर्ण झाले नाही, असेही थोरात म्हणाले
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेतकरी या वर्षात अवकाळी आणि दुष्काळी, अशा दुहेरी संकटांचा सामना करतो आहे. दुष्काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही दिलासा मिळालेला नाही. त्यातच अवकाळी पावसाचे संकट येऊन उभे ठाकले आहे. सरकारने नुसती मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या मागणीवर सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे. शेतकरी सभागृहाचे कामकाज बघतो आहे. शेतकऱ्यांना या अधिवेशनाकडून मोठ्या आशा आहेत. मात्र सरकार असंवेदनशीलपणा अत्यंत चुकीचा व निषेधार्ह आहे, असेही आमदार थोरात म्हणाले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.