
Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने भाजपचे राम सातपुते यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर विधानसभेप्रमाणे मतदान घेण्याची तयारी गावकऱ्यांनी केली होती.
या निवडणूक प्रक्रियेचा खर्च करण्याची तयारीही गावाने केली होती. प्रशासनाने त्यांना मतदान घेण्यास परवानगी दिली नाही, मतदान घेऊ नका, असे पोलिसांनी गावकऱ्यांना सांगितले होते. गावात जमावबंदी लावण्यात आली आहे. मतदान सुरु होण्यापूर्वीच गावकऱ्यांनी मतदान प्रक्रिया थांबवली.
"प्रशासनाच्या दबावानंतर गावकऱ्यांनी मतदान प्रक्रिया थांबवली," असे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले. बॅलेट पेपरवर मतदान सुरु होण्यापूर्वी मतदान बुथवर जाऊन मतदान घेऊ नका, जमावबंदी आहे, याची माहिती पोलिसांनी दिली. माळशिरस तालुक्यातील मारकवाडी गावात एकूण 2300 मतदानापैकी 1905 मतदान झाले आहे.
मतमोजणीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले आहे. मात्र, ग्रामस्थांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते (सुमारे 1000) यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेतला आहे. जानकर यांना मानणाऱ्या या गावात सातपुते यांना मताधिक्क मिळणं अशक्य असल्याचे म्हटले आहे. त्यावरून गावकऱ्यांनी फेरमतदानाची मागणी केली होती.
माळशिरस मारकडवाडी येथील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. येत्या आठ दिवसात 25 ते 50 हजार नागरिकांसमवेत माळशिरस तहसीलवर मोर्चा काढणार असल्याचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.
उत्तम जानकर यांची पोलिस प्रशासनाबरोबर बंद दाराआड चर्चा केली. मारकरवाडी येथील मतदान प्रक्रिया थांबवत असल्याची माहिती उत्तम जानकर यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत ईव्हीएमच्या (EVM) विरोधात विविध मार्गाने आवाज उठवला आहे. महाविकास आघाडीच्या राज्यभरातील अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. अनेक जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.