Rohit Pawar : बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल! मारकडवाडी मतदान प्रक्रियेवर रोहित पवार भडकले

Markadwadi Ballot Paper Voting : मारकडवाडीत ग्रामस्थांकडून होणारं मतदान म्हणजे EVM मध्ये कोणतीही गडबड नसल्याचं आणि ते पारदर्शक असल्याचं सिद्ध करण्याची निवडणूक आयोगाला नामी संधी आहे… पण
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने evm बाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत .

पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं असताना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची इतक्या मोठा प्रमाणात पीछेहट होणं शक्य नसल्याचं सांगत महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएम विरोधात आवाज उठवताना पाहायला मिळत आहेत.

Rohit Pawar
Shiv Sena News : निवडणुकीच्या आखाड्यात 'धारातीर्थ' पडलेल्या पाच शिलेदारांना शिंदेंकडून दिलासा; तुम्हाला न्याय देऊ!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या गावातून केवळ 843 मते तर विरोधी असलेल्या भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाली आहेत. यापूर्वीच्या मागील तीन निवडणुकांमध्ये जानकर यांच्या गटाला या गावातून 80 टक्के मतदान झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील अशीच आकडेवारी समोर आली होती.

Rohit Pawar
Markadwadi Ballot Paper Voting : मारकडवाडी बॅलेट मतदानाबाबत मोठी अपडेट; आमदार जानकरांनी घेतला 'हा' निर्णय

या विधानसभा निवडणुकीत जानकर यांना मतदान कमी झाल्याने त्यांनी घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. यासाठी तीन डिसेंबरला आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव गावातील ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रक्रियेसाठी तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी शासकीय कर्मचारी पुरवावेत, अशी मागणी केली होती. मात्र त्यास प्रशासनाकडून नकार देण्यात आला. त्यानंतर देखील जानकरांनी मतदान घेण्याबाबत ठाम भूमिका घेत आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत जानकर यांच्याशी चर्चा करून मतदान प्रक्रिया थांबवली.

याबाबत शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मारकडवाडीत ग्रामस्थांकडून होणारं मतदान म्हणजे EVM मध्ये कोणतीही गडबड नसल्याचं आणि ते पारदर्शक असल्याचं सिद्ध करण्याची निवडणूक आयोगाला नामी संधी आहे… पण या संधीचा लाभ घेण्याऐवजी बॅलेट पेपरवर मतदानच होऊ नये म्हणून भेदरलेल्या प्रशासनाने तिथं जमावबंदी लागू केलीय आणि लोकं मतदानाला येऊ नयेत म्हणून लोकशाही असतानाही ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केलाय.

‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ ही एक अर्थपूर्ण प्रसिद्ध मराठी म्हण आहे. त्यानुसार मारकडवाडीतील मतदानाच्या माध्यमातून आयोगाने एकतर पारदर्शकतेचा बाप दाखवावा नाहीतर EVM चं श्राद्ध तरी घालावं.. पण आयोग यापासून का पळ काढतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com