Milind Deora : 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेसने कधीच मानलं नाही', मिलिंद देवरांचा हल्लाबोल

Lok Sabha News : काँग्रेस नेमकी काय आहे हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहीत आहे. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कधीच मानलं नाही, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
Milind Deora
Milind Deora Sarkarnama

Kolhapur News : महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ खासदार मिलिंद देवरा हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेमकी काय आहे हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहीत आहे. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कधीच मानलं नाही, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला आहे.

संजय मंडलिक हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. कोल्हापूरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी उभी राहील.

काँग्रेस काय आहे? हे मला चांगलं माहिती आहे. काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत, अशा शब्दांत खासदार मिलिंद देवरा Milind Deora यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.

Milind Deora
Shashikant shinde News : पाच वर्षांत शशिकांत शिंदेंच्या संपत्तीत १०.१२ कोटींनी वाढ; ८४.९८ लाखांचे कर्ज...

काँग्रेसने वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांना उमेदवारी न दिल्याने त्यावरही मिलिंद देवरा यांनी हल्लाबोल चढवला आहे. वर्षा गायकवाड ही माझी बहीण आहे. माझे वडील आणि वर्षा गायकवाड यांच्या वडिलांचे जुने संबंध होते. काँग्रेसने Congress दलितांमधील केवळ एक उमेदवार दिला. काँग्रेसची भूमिका दलितविरोधी आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे. त्यामुळे पूर्ण राज्यात काँग्रेसवर खूप नाराजी आहे. महाविकास आघाडी ही संधी साधू आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ नका म्हणून मी काँग्रेसला त्यावेळी वारंवार सांगत होतो. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून दिल्लीतील कोणत्याही नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना कधी अभिवादन केलं नाही, असा खोचक टोला खासदार देवेरा यांनी काँग्रेसला लगावला.

महाविकास आघाडीतील MVA पक्षांनी खोक्यासाठी, खुर्चीसाठी एकत्र आले. मुंबईत सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे घरांचा आहे.

मी सर्व सामान्य नागरिकांना घरं देण्याचा प्रयत्न केला. पण खासदार अरविंद सावंत Arvind Savant यांच्या इमारतीची ओसी नाही. तर अरविंद सावंत गोरगरीब जनतेला घरं काय देणार? असा आरोप करत त्यांनी सवाल ही उपस्थित केला आहे.

R

Milind Deora
Udayanraje Bhosale News : उदयनराजेंच्या संपत्तीत १५.६९ कोटींनी वाढ; २.४४ कोटी रुपयांचे कर्ज

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com