Hasan Mushrif On Gokul : 'गोकुळ'च्या सभेतील 'राड्या'वरून मुश्रीफांनी महाडिक गटाला फटकारलं; म्हणाले," अब्रू राज्याच्या वेशीवर..."

Gokul Dudh Sangh Political News : '' गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांच्या, उत्पादकांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी असते...''
Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या सभेपूर्वीच सभासदांचा गोंधळ घालण्यात आला होता. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या 'गोकुळ'च्या शुक्रवारी झालेल्या सभेत महाडिक समर्थक पोलिसांची सुरक्षा आणि बॅरिगेट्स तोडून महाडिक समर्थक सभेत घुसले. सभेच्या ठिकाणी अचानक जमाव आल्याने या वेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडाली.

'गोकुळ'वरून कोल्हापुरातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. महाडिक - सतेज पाटील आमनेसामने आले असून, दावे प्रतिदाव्यांनी राजकारण पेटलं आहे. याचवेळी आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळवरून महाडिक गटाला फटकारले आहे.

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Harshvardhan Jadhav On Loksabha : मुसलमान निवडून येतो म्हणून माझ्या नावाने कितीही खडे फोडा, मी लोकसभा लढवणारच...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी कागल तालुक्यातील व्हन्नूरमधील हनुमान दूध संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. ते या का्र्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेला गोंधळ आणि हुर्रेबाजीवर निशाणा साधला.

मुश्रीफ म्हणाले, दूधधंदा आता दुय्यम राहिलेला नाही. तो शेतकऱ्यांचा मुख्य झाला आहे. गोकुळ दूध संघ संबंध कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. वार्षिक सभेतील घोषणाबाजी आणि गोंधळ यातून गोकुळ दूध संघा(Gokul Dudh Mahasangh) ची अब्रू राज्याच्या वेशीवर टांगणे आता बंद करा. गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांच्या, उत्पादकांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी असते.

मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा महाब्रँड आहे. परंतु, प्रसंगी तोटा सहन करून गोकुळ ब्रँडला मोडायचे आक्रमक कारस्थान अमूल दूध करत आहे, अशा परिस्थितीत गोकुळचे वैभव टिकवायचे असेल, तर गांभीर्याने घ्या. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत म्हशीच्या दुधात पाच लाख लिटर वाढ झालीच पाहिजे, ही शपथ घेऊया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले.

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत महाडिक गटाचा राडा...

'गोकुळ'ची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली असून, ती अनेक कारणांनी वादळी ठरली. संचालिका शौमिका महाडिकांनी सभेतील राड्यावरून माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटलांवर टीकेची झोड उठवली होती. त्या म्हणाल्या, सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सभासदांना पाण्याची बाटलीही सोबत नेण्यास परवानगी नव्हती. 'ओळखपत्रांची तपासणी करूनच सभासदांना आतमध्ये सोडले जात होते. त्यासाठी एक रांग केली होती, ती दोन किलोमीटरपर्यंत लागली होती. असा प्रकार यापूर्वी कधीच झाला नव्हता. मी रांगेतील सभासदांशी बोललाे असून, ते खरे सभासद आहेत. सभेला निम्म्याहून अधिक सभासद बोगस होते. सतेज पाटलांमध्ये (Satej Patil) आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमतच नसल्याने असे प्रकार करण्यात आले,' असा आरोप महाडिकांनी केला.

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
MLA Disqualification Case : एका आठवड्यात पुढच्या सुनावणीची तारीख द्या; सरन्यायाधीशांचे विधानसभा अध्यक्षांना आदेश

गोकुळच्या सभेपूर्वी महिनाभर (Shoumika Mahadik) शौमिका महाडिकांनी कोल्हापूर दौरा केला होता. त्यावेळी सभासदांशी चर्चा करून त्यांच्या वतीने काही प्रश्न गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना विचारणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सभेत मात्र महाडिकांना बोलूच दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे आपण समांतर सभा घेणार असल्याचे शौमिका महाडिकांनी जाहीर केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
MP Hemant Patil News : हिंगोलीत राजकारण तापलं, खासदार हेमंत पाटलांना ठाकरे गटाची धमकी; म्हणाले, "यापुढे ते जिल्ह्यात फिरले तर..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com