PM Modi On OBC : महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा-ओबीसी वाद पेटलेला असताना PM मोदींचं मोठं वक्तव्य...

Maratha Reservation Issue And PM Modi Statement On OBC : महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी असा वाद सुरू झाला आहे. मराठा समाजानंतर ओबीसी आक्रमक झाले आहेत...
PM Modi
PM Modi Sarkarnama
Published on
Updated on

PM Modi On OBC : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना राज्यातील ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. मराठा समाजाचे मोर्चे आणि सभा झाल्यानंतर आता ओबीसी समाजाच्या नेत्यांकडूनही मेळावे घेण्यात आले आहेत. यामुळे महाराष्ट्र मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तापत चाललं आहे. अशातच आता पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या एका प्रचार सभेत ओबीसींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यातलं वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत.

PM Modi
Amit Shah News : मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले; राजस्थानमध्ये प्रचार सभेत जात असतानाच...

मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक आहेत. जुन्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसींच्या आरक्षणावर घाला घातला जात असल्याचा आरोप करत ओबीसी संघटांनी आणि नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापलं असताना आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. मराठा सामाजाला ओबीसीतून राजकीय आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्यात ओबीसी आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असताना पंतप्रधान मोदींनी ओबीसींबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

ओबीसींबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ओबीसींना फक्त भाजपच न्याय देऊ शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात पूर्ण बहुमत असलेल्या सरकारचा पहिला ओबीसी पंतप्रधान बनवून तुम्ही माझा सन्मान केला होता. फक्त भाजपच ओबीसींच्या हिताची सर्वाधिक काळजी घेऊ शकते. शोषित वर्गाचं कल्याण करणं हेच भाजपचं ध्येय आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाजपने ओबीसींना सन्मानाचे स्थान दिले आहे. केंद्रातील एनडीए सरकारमध्ये २७ ओबीसी मंत्री आहेत. आणि स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी संख्या आहे. आता भाजपकडे देशभरात ८५ ओबीसी खासदार, विधानसभांचे ३६५ आमदार आणि विधान परिषदेत ६५ आमदार आहेत. आणि तेलंगणच्या जनतेने भाजपला संधी दिली तर राज्यात पहिला ओबीसी मुख्यमंत्री मिळेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींची हैदराबादमध्ये मंगळवारी प्रचार सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसचा इतिहास बघा. त्यांनी फक्त अशाच लोकांना पुढे केलं जे दिल्लीतील दरबारात हजेरी लावत होते. एससी, एसटी आणि ओबीसी या समाजातील प्रभावी नेतृत्वाला काँग्रेसने कधीच मोठं होऊ दिलं नाही. काँग्रेसच्या याच दरबारी मानसिकतेमुळे काँग्रेसचे नेते एकच काम करता. सकाळ संध्याकाळ मोदींवर टीका करणं. मोदींवर टीका करता करता ते संपूर्ण ओबीसींवर टीका करत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मध्य प्रदेशच्या सीधीमध्ये पंतप्रधान मोदींची प्रचार सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. मध्य प्रदेशसह राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या सभा होत आहेत.

PM Modi
Rahul Gandhi - Varun Gandhi Meets : राहुल आणि वरुण गांधींच्या भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com