Hasan Mushrif News : मंत्री हसन मुश्रीफांचे 'ते' विधान अन् कोल्हापूरमधील 18 गावं पेटून उठली

Kolhapur Political News : गुरुवारी 'या' प्रस्तावित 18 गावांतील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. युतीच्या राज्यातील दोन नंबरचे मंत्रिपद कोल्हापुरात असतानादेखील शहर हद्दवाढीचा मार्गी लागला नव्हता, तर महाआघाडी सरकारच्या काळात केवळ जनमत विचारात घेता याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करण्यात आला होता.

पण, महायुतीच्या काळात पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी हद्दवाढीचे संकेत दिले आहेत. यानंतर अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार असला तरी मुश्रीफ यांच्या विधानाने प्रस्तावित 18 गावांत हद्दवाढीवरून संघर्ष उफाळला आहे.

Hasan Mushrif
Sanjay Gaikwad News : " उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या हत्येचा कट..."; आमदार गायकवाडांचा खळबळजनक दावा

हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री झाल्यापासून कोल्हापूर महापालिकेत पहिली आढावा बैठक घेतली. या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी येत्या वर्षभरात हद्दवाढ करण्याचे संकेत दिले. हद्दवाढ करत असताना प्रस्तावित 18 गावांपेक्षा शहरात मिसळलेल्या गावांना शहराच्या हद्दवाढीत घेण्याचा प्रयत्न आहे. काही मोजकीच गावे शहरात मिसळलेली आहेत. त्यामुळे आमच्या परीने हद्दवाढ करण्याचा प्रयत्न राहील, असेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.(Kolhapur)

उद्या गावं बंद ठेवण्याचा इशारा

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाडीचे संकेत दिल्यानंतर कोल्हापूरशेजारील गावांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढीविरोधात पुन्हा 18 गावांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रस्तावित 18 गावांतील ग्रामस्थांनी पाहिल्यासून विरोध केला असून, पालकमंत्री मुश्रीफ यांच्या एका विधानाने आंदोलनाची धार आणखी वाढली आहे. गुरुवारी 12 ऑक्टोबरला या प्रस्तावित 18 गावांतील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

...आणि मगच आमच्या हद्दवाढ करा!

दरम्यान, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर हद्दवाढविरोधी कृती समितीने आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. हद्दवाढीतील प्रस्तावित 18 गावं कडकडीत बंद ठेवण्याचे डिजिटल बोर्ड झळकले. त्याबाबत कृती समितीने प्रत्येक गावात बोर्ड लावत गाव बंद ठेवण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले आहे. त्याला ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. अगोदर शहराचा विकास करा, मगच आमच्या हद्दवाढ करा, असा सूर प्रस्तावित ग्रामस्थांमध्ये आहे. (NCP Political News)

मुश्रीफ यांना हद्दवाढ शक्य, पण...

कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. सुरुवातीला 18 गावांचा समावेश व्हावा, असा प्रस्ताव नगरविकास विभागाला दिला होता. मात्र, त्याला गावपातळीवरून विरोध झाला होता. कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील ही गावे आहेत. प्रत्येकाने आपली राजकीय इच्छाशक्ती दाखवली असती, तर शहराच्या हद्दवाढीचा विषय आतापर्यंत मार्गी लागला असता, पण या दोन्ही मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींना हद्दवाढीपेक्षा आपल्या राजकीय प्रवासाची चिंता लागली आहे.

Hasan Mushrif
Marathwada Political News : चंद्रकांत खैरे चारदा खासदार झाले ; पण कुटुंबीय आजही विकतात अंत्यसंस्काराचे साहित्य..

करवीरमधील लोकप्रतिनिधींनी तर उघड भूमिका घेऊन सुरुवातीला हद्दवाढीला विरोध केला, तर दक्षिणमधील लोकप्रतिनिधींनी हद्दवाढबाबत जाहीरपणे भूमिका मांडलेली दिसत नाही. केवळ जनमताचा फटका बसेल, या धास्तीने अनेकांनी सत्ता असतानाही त्याबाबत भूमिका न घेतल्याचे दिसून आले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढ करण्याचा निर्णय घेतल्यास या गावांतून त्यांना कोणतीही राजकीय अडचण नसल्याचे दिसून येत आहे. कारण हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातील नेतृत्व करतात. त्यामुळे जर मुश्रीफ यांनी हा निर्णय घेतल्यास शहरात मुश्रीफ बाजीगर ठरू शकतात.

(Edited By Deepak Kulkarni)

Hasan Mushrif
Sanjay Gaikwad News : " उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या हत्येचा कट..."; आमदार गायकवाडांचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com