
Kolhapur : ऐतिहासिक माणगाव परिषदेला 105 वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाचे 'बार्टी'कडून अत्यंत ढिसाळ आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः जाहीर भाषणातून कार्यक्रमाच्या आयोजनावर नाराजी व्यक्त केली. तसेच बार्टीच्या अधिकाऱ्यांवर ताशेरेही ओढले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे ऐतिहासिक परिषद पार पडली होती. या परिषदेस 105 वर्ष पूर्ण झाल्याने 'बार्टी' कडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
सकाळी मंत्री शिरसाठ कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले. मात्र बार्टी कडून करण्यात आलेल्या ढिसाळ नियोजनामुळे मंत्री शिरसाट यांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली.
शिरसाट म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीत शाहू महाराजांनी पुढचा राजा, दलित जनतेचा राजा म्हणून याच भूमीत घोषणा केली. माणगावच्या गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहायला मिळाली होती. गावकऱ्यांनी साडेचार एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली. सामाजिक सलोखा टिकवण्याचा माणगावकरांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.
यानंतर मंत्री शिरसाट आपला मोर्चा आयोजकांकडे वळवला. हा ऐतिहासिक कार्यक्रम ज्या उंचीचा व्हायला पाहिजे होता, त्या पद्धतीने झाला नाही. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसंच लंडन हाऊसचं काम अपूर्ण आहे. याबाबतच्या सूचना मी दिल्या आहेत. येत्या एप्रिल अखेरपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा भेट देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.