Murder Case : कोल्हापूर-सांगली सीमेवर थरार! माजी सरपंचाच्या पतीचा निर्घृण खून; गाडीचा पाठलाग केला, गाडीची काच फोडली अन् मानेवर वार केला

Former Sarpanch Husband Murdered In Haripur : किरकोळ वादातून कोथळीत हरिपूरच्या माजी सरपंचांच्या पतीचा खून करण्यात आला आहे. चारचाकी वाहन आडवे मारण्याच्या कारणातून सुऱ्याने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे.
Murder Case
Murder CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jaysingpur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात रस्त्यावर झालेल्या वादातून एका व्यावसायिकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज तालुक्यातील हरिपूर येथील माजी सरपंचाचे पती विकास बाबूराव बोंद्रे (वय ४५) यांच्यावर कोथळी येथे हल्ला करण्यात आला. मंगळवारी (२४ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

जयसिंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास बोंद्रे हे मित्र महमंद नायकवडी यांच्यासोबत मोटारीतून कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. काम आटोपून ते सायंकाळी हरिपूरकडे परतत असताना कोथळी येथे संशयित अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (वय ३६, रा. कोथळी, ता. शिरोळ) यांची गाडी त्याच मार्गावर होती.

बोंद्रे यांच्या मोटारीमुळे संशयिताच्या गाडीला अडथळा झाल्याचा राग आल्याने त्याने बोंद्रे यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. रिंग रोडवर बोंद्रे यांची गाडी आल्यानंतर संशयिताने ती अडवली. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. वाद वाढल्यानंतर संशयिताने बोंद्रे यांच्या गाडीची काच फोडली आणि जवळील हत्याराने त्यांच्या मानेवर वार केला. हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला.

Murder Case
Shrirampur murder case : 800 रुपयांच्या फटाक्यांवरून वाद; तलवार, कुऱ्हाड घेऊन टोळक्याचा हल्ला, कार अंगावर घालून एकाला संपवलं!

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विकास बोंद्रे यांना त्यांचे मित्र महमंद नायकवडी यांनी तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

विकास बोंद्रे यांच्या पत्नी कविता या हरिपूरच्या माजी सरपंच आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलिस करत आहेत. जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Murder Case
Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर यांचा हत्यारा पप्या शिंदेविरोधात 11 गुन्हे; संघटीत गुन्हेगारीमुळे 'SIT'कडून 'मकोका'ची तयारी

दरम्यान, कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नशेखोरीतून गुन्हेगारी वाढत असल्याने या भागात अमली पदार्थांच्या गैरवापरावर नियंत्रण आणण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिस यंत्रणांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.