जयंत पाटलांनी फुंकले रणशिंग : मिरजेचा पुढील आमदार राष्ट्रवादीचाच

कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी पार्टीला पूर्व भागात बळ मिळेल
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

आरग (जि. सांगली) : मिरज पूर्व भाग आणि तालुक्याच्या संपूर्ण राजकीय राजकारणावर येथून पुढे राष्ट्रवादीचेच वर्चस्व असेल. मिरज विधानसभेचा आमदार आणि तालुक्याची पंचायत समिती ही दोन्ही राष्ट्रवादीच्याच ताब्यात असेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील यांनी केला. (Miraj's next MLA will be from NCP: Jayant Patil)

आरग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पक्षप्रवेश व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप (तात्या) पाटील उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले,‘‘जलसंपदा मंत्र्यांनी महापुराचे पाणी म्हैसाळ योजनेतून दुष्काळी भागाला पुरवले, कर्नाटकशी समन्वय साधून कृष्णेचे पाणी नियंत्रित केले.’’

Jayant Patil
तेव्हा ५७ लाख वाटले; पण गणपतराव देशमुख गटाला हिसका दाखवला

संयोजक व निमंत्रक आणि मोहनराव शिंदे कारखान्याचे चेअरमन मनोजबाबा शिंदे म्हणाले,‘‘असंख्य कार्यकर्त्यांच्या जोरावर येणाऱ्या सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळेल.’’ मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद इनामदार म्हणाले,‘‘जलसंपदा मंत्र्यांनी स्वतः पूर्वभागात लक्ष घातल्याने कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह वाढला आहे.’’ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले,‘‘ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न राष्ट्रवादीने नेहमीच सोडवले आहेत.’’ मार्केट कमिटी सभापती दिनकर (तात्या) पाटील म्हणाले,‘‘कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी पार्टीला पूर्व भागात बळ मिळेल.’’

Jayant Patil
आता कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर युती नाही : राष्ट्रवादीचा निर्धार

पूर्व भागातील ४२ गावांमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश झाला. गर्दी असूनही मेळाव्याचे नियोजन नेटक झाले होते. मेळाव्यास पूर्व भागातील कार्यकर्त्यांची लक्षणीय गर्दी होती. मेळाव्यातील जयंत पाटील यांच्या भाषणाने पूर्व भागातील कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा मिळाली अशी चर्चा होती. यावेळी ॲड . बाळासाहेब मुळीक, विराज नाईक, बाळासो व्हनमोरे, सुषमाताई जाधव, पूजाताई लाड, सौ. चंपाताई जाधव, सौ. स्मिता पाटील, शिवाजी महाडिक, गंगाधर तोडकर, वास्कर शिंदे, आप्पासाहेब हल्ले, एस. आर. पाटील, शरद ओमसे आदी उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजक व निमंत्रक मोहनराव शिंदे कारखान्याचे चेअरमन मनोजबाबा शिंदे यांनी केले.

राष्ट्रवादीत यांनी केला प्रवेश

आरगमधून एस. आर. पाटील गट, बोलवाड मधून सुहास पाटील, मल्लेवाडी मधून सरपंच विनायक पाटील व सर्व सदस्य, मालगाव मधून माजी सरपंच प्रशांत माळी व कार्यकर्ते, सलगरे मधून नितीन जाधव, एरंडोली मधून बी. के. पाटील, दादासो पाटील, नारवाड मधून धनाजी पाटील, उत्तम पाटील आदी गावांसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com