Kolhapur Tourism Book : कोल्हापूर प्रशासनाचा सावळा गोंधळ! जिल्ह्याच्या पर्यटन पुस्तिकेत चुकीचे फोटो अन् प्रकाशनही केले

Mistakes in Kolhapur Tourism Book : तिल्लारी धरण म्हणून एका दुसऱ्याच धरणाचा फोटो या पुस्तकात छापला आहे. पावनगड म्हणून कर्नाटकातील एका किल्ल्याचा फोटो छापण्यात आला आहे.
Kolhapur Tourism Book
Kolhapur Tourism BookSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापूर प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन संदर्भात माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar), जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे पर्यटनची माहिती देणाऱ्या पुस्तक छापणाऱ्याने थेट गुगलचा वापर करत चुकीचे संदर्भ देत फोटोही भलतेच छापले आहेत. दरम्यान याबाबतची माहिती दिल्यानंतर माहिती अधिकाऱ्यांनी थेट सारवासारवीचे उत्तर देत फायनल प्रिंट लवकरच छापायची आहे. असे स्पष्टीकरण दिले. मात्र हे पुस्तक प्रकाशित करण्याची इतकी घाई प्रशासनाला का लागली होती? असा सवाल उपस्थित होत आहे.

Kolhapur Tourism Book
T Raja Singh News : ''नागा साधूंना जर 15 मिनिटं दिली, तर हैदराबादेत...'' ; भाजप आमदार टी.राजा यांचं मोठं विधान!

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पर्यटन स्थळाचे माहिती देणारे पुस्तक आज प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकांमध्ये कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पावनगड, महिपालगड, शिवगड यासंदर्भातील फोटो इतर किल्ल्यांवरील वापरण्यात आले आहेत. तर तिल्लारी धरण म्हणून एका दुसऱ्याच धरणाचा फोटो या पुस्तकात छापला आहे. पावनगड म्हणून कर्नाटकातील एका किल्ल्याचा फोटो छापण्यात आला आहे. तर महिपालगडावरील बुरुजाच्या ठिकाणी राजमाची किल्ल्यावरील बुरुज छापण्यात आला आहे.

वास्तविकरित्या गडकिल्ल्यांवर चे फोटो छापत असताना एखाद्या तज्ञाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे होते. मात्र त्या ठिकाणी थेट गुगलचाच वापर करत फोटो छापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Kolhapur Tourism Book
India Budget Tradition : अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस अन् वेळेबाबत इंग्रजांपासूनची परंपरा सर्वप्रथम 'या' अर्थमंत्र्यानी मोडली!

चुकीचे संदर्भ देऊन फोटो छापल्यानंतर याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याला विचारले असता, त्यांनी थेट ही फायनल प्रिंट नव्हे. याची फायनल प्रिंट येत्या आठ दिवसात येणार आहे. जुजबी उत्तर देण्यात आले. फायनल प्रिंट नव्हती तर पालकमंत्री यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची इतकी घाई संबंधित अधिकाऱ्यांना का लागली होती? असा सवाल उपस्थित होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com