Municipal Elections : कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त सतरंज्याच उचला! बापू आमदार झाले, आता नगरपालिकेच्या मैदानात उतरवले घरातीलच दोन उमेदवार

MLA Ashokrao Mane Politics : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सतत चर्चेत असणारे आमदार अशोकराव माने हे पुन्हा एकदा शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत.
Municipal Elections; MLA Ashokrao Mane
Municipal Elections; MLA Ashokrao Mane sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मागील निवडणुकीत आमदारकी न मिळाल्यानंतर युतीच्या माध्यमातून अशोकराव माने 2024 ला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार झाले.

  2. शिरोळ नगराध्यक्ष पदाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागल्यानंतर त्यांनी सुनबाई सारिका माने यांना उमेदवारी दिली आहे.

  3. त्याचबरोबर त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अरविंद माने हेही रिंगणात उतरल्याने शिरोळमध्ये ‘माने परिवार’ चर्चेचा विषय ठरला आहे.

Kolhapur News : मागील विधानसभा निवडणुकीत प्रयत्नांची पारकाष्टा करून देखील दलित मित्र अशोकराव माने हे आमदारकी पासून वंचित राहिले. मात्र महायुतीमध्ये जनसुराज्य व्हाया शिवसेना, भाजप करत अशोकराव माने 2024 ला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यांच्या आमदारकीला वर्षपूर्ती होत असताना अनेक मुद्द्यांवरून ते चर्चेत राहिले. कोल्हापुरातील मराठा समाजाची जागा आणि त्यावरून झालेल्या टीकेला माने यांना सामोरे जावे लागले. पण पुन्हा एकदा आमदार अशोकराव माने हे शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत.

शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्यानंतर आमदार अशोकराव माने यांनी आपल्या सुनबाई सारिका माने यांना ताराराणी आघाडी आणि महायुतीकडून थेट रिंगणात उतरवले आहे.

इतकेच नव्हे तर माजी नगरसेवक आणि पुत्र अरविंद अशोकराव माने हे देखील नगरसेवक पदासाठी शिरोळ नगरपालिकेच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक दोन अ मधून ते अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तर अन्य एक उमेदवार त्यांच्याच भाऊबंदकीतील असलेला सांगितले जाते.

Municipal Elections; MLA Ashokrao Mane
Kanhan Municipal Election : निवडणुकीच्या मैदानात सासू विरुद्ध सून भिडणार; मुलगा हतबल! निकालाची उत्कंठा

गेल्या काही दिवसांपासून हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने हे चर्चेत आहेत. जनसुराज्य शक्तीकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र अशोकराव माने हे शिवसेनेचेच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांकडून केला जातोय. तर दुसरीकडे आमदार अशोकराव माने हे भाजपचे असल्याचे सांगितले जाते.

या सर्वांच्या दावा- प्रतिदावांमध्ये आमदार माने हे कोणाला दुखावत नसल्याचे चित्र आहे. कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम असो किंवा कोणत्या मंत्री आणि नेत्यांचा दौरा असो, या सर्वांच्या कार्यक्रमाला आमदार माने हे उपस्थिती लावतात. नेत्यांची मर्जी सांभाळणाऱ्या आमदार माने यांनी एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्यायला हवी होती, अशी चर्चा शिरोळ मतदार संघातून उमटत आहे.

Municipal Elections; MLA Ashokrao Mane
Municipal elections : राज्यभरात महायुती, महाविकास आघाडीला तडे; 'स्वबळा'च्या भूमिकेमुळे नगरपालिका निवडणुकीत कोण मारणार 'राजकीय बाजी

FAQs :

1. शिरोळ नगराध्यक्ष पदाला आरक्षण कसे लागू झाले?

यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षण लागू असल्याने या पदावर SC उमेदवारच उभा राहू शकतो.

2. सारिका माने कोण आहेत?

त्या आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाई असून या वेळी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत.

3. अरविंद माने कोणत्या पदासाठी उभे आहेत?

अरविंद माने हे माजी नगरसेवक असून पुन्हा निवडणुकीत उभे आहेत.

4. माने परिवारावर टीका का होते आहे?

एका कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीत उभे राहिल्याने वर्चस्ववादाचे आरोप होत आहेत.

5. शिरोळमध्ये राजकीय वातावरण कसे आहे?

माने परिवाराच्या एंट्रीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com