Municipal elections : राज्यभरात महायुती, महाविकास आघाडीला तडे; 'स्वबळा'च्या भूमिकेमुळे नगरपालिका निवडणुकीत कोण मारणार 'राजकीय बाजी

Municipal elections News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र महायुती व महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिकच्या या निवडणुकीत सर्वच पक्षाचा कस लागणार आहे.
Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkalsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जवळपास चर वर्षानंतर मुहूर्त लागला आहे. निवडणूक आयोगाने ठरवल्यानुसार नगरपालिका व नगरपंचायतीसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहेत. तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत तर तिसऱ्या टप्प्यात महापलिकाच्या निवडणुका होणार आहेत.

राज्यातील 243 नगरपालिका व 43 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र, लोकसभा व विधनासभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढली होती तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र महायुती व महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिकच्या या निवडणुकीत सर्वच पक्षाचा कस लागणार आहे.

नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यातील काही नगरपालिकेत युतीधर्म बाजूला ठेऊन काही ठिकाणी भाजप (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने युतीधर्म गुंडाळून ठेवला आहे. तर महाविकास आघाडीतही बंडाळी झाली आहे. सर्वच पक्षांनी सोयीनुसार पक्ष सोबत घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात सीएम देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यापुढे स्थानिक बंडखोरांचे मोठे आव्हान उभे टाकले आहे.

गटबाजीमुळे उमेदवारीची 'लॉटरी'; मतदारांचा कौल कोणाला?

भाजपने सर्वच सोयीनुसार युती केली आहे. ताकद असलेल्या ठिकाणी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. तर कमी ताकद असलेल्या ठिकाणी सोयीनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेना अथवा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये फूट पडली आहे. तर काही ठिकाणी एकाच पावसाच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी चार-चार पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाची दावेदारी मोठी आहे.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
Congress-Shiv sena News : पाथरीत 'खान विरुद्ध खान' संघर्ष; बाबाजानी अन् सईद खान समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी!

महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना जागावाटपावरून आणि स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेमुळे अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे राहावे लागले आहे. यामुळे, मुख्य पक्षाचा अधिकृत उमेदवार एकीकडे आणि बंडखोर उमेदवार दुसरीकडे, अशी परिस्थिती आहे. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पारंपरिक जागांवर तडजोड न झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. यामुळे मतदारांसमोर एकाच पक्षाचे दोन 'निष्ठावान' उमेदवार उभे राहिले आहेत.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीत राहूनही कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार अन् प्रचार करणारा अजितदादांचा आमदार अडचणीत; अटकेची टांगती तलवार

स्थानिक आघाड्या 'किंगमेकर'? भाजप-राष्ट्रवादीच्या पारंपरिक जागा धोक्यात!

राज्यातील या प्रमुख नगरपालिकेत स्थानिक आघाड्या 'किंगमेकर' ठरणार आहेत. त्यामुळे त्याचा फटका काही ठिकाणी भाजपला तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. महायुतीमधील भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे उमेदवारी वाटपात एकमत न झाल्याने गटबाजी उफाळली आहे. या 'बंडखोरां'ना शांत करण्यासाठी सीएम देवेंद्र फडणवीस-अजितदादांची शेवटच्या क्षणापर्यंत दमछाक झाल्याचे पाहावयास मिळाले. विशेषतः आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसपुढे स्थानिक स्तरावरील आघाडी शक्तिशाली ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात यश मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
Shivsena Politics : सात वर्षांची शिक्षा भोगून बाहेर पडताच शिंदेंचा शिलेदार थेट प्रचाराच्या मैदानात! मंत्री उदय सामंतांबरोबर स्टेजही शेअर केलं

शिंदे-ठाकरे गट आमनेसामने; मतांची निर्णायक विभागणी कोणाच्या पथ्यावर?

नगरपालिका निवडणुकीत राज्यातील कोकण, मुंबई, ठाणे व मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदेची शिवसेना आमने-सामने आली आहे. त्यामुळे या दोन पक्षाच्या मतविभागणीचा फायदा काही ठिकाणी अन्य पक्षाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. विशेषता काही ठिकाणी भाजप तर काही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
BJP Strategy : नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या अर्ध्या उमेदवारांच्या हातात कमळ, भाजपची खेळी ठाकरे व पवारांनाही उमगली नाही

कुठे उद्धव ठाकरेंची 'मशाल' धगधगणार? तर कुठे एकनाथ शिंदेंचा 'बाण' लक्ष भेदणार?

कोकण, मुंबई, ठाण्यात ठाकरे-शिंदे बालेकिल्ला आहे. दोन्ही गटांकडून आपली पारंपरिक ताकद सिद्ध करण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. तर दुसरीकडे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळ आणि युतीधर्मातील फूट कोणासाठी फायद्याची ठरणार? भाजप आणि राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय 'खरी शिवसेना' कोणती, हे ठरणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे काही ठिकाणी सर्वच पक्षांनी युती व आघाडीधर्म बाजूला ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या काळात 'स्वबळा'च्या भूमिकेमुळे नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार यासाठी ३ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
Devendra Fadnavis News : विविध पदांच्या परीक्षांच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र; CM फडणवीसांची सर्व विभागांना तंबी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com