Kanhan Municipal Election : निवडणुकीच्या मैदानात सासू विरुद्ध सून भिडणार; मुलगा हतबल! निकालाची उत्कंठा

Gumfa Tidke VS Darshana Tidke : राजकीय पक्षांनी एकमेकांचे उमेदवार पळवण्यासोबत एकाच घरातील सासू सुनेला एकमेकींच्या विरोधात तिकीट दिल्याचे समोर आले आहे.
Kanhan Municipal Election witnesses a rare political clash as mother-in-law Gumfa Tidke faces daughter-in-law Darshana Tidke
Kanhan Municipal Election witnesses a rare political clash as mother-in-law Gumfa Tidke faces daughter-in-law Darshana Tidkesarkarnama
Published on
Updated on

Kanhan Municipal Election : नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची पळवापळी चांगलीच गाजत आहे. आता या पळवापळवीत राजकीय नेत्यांनी सासू-सुनेलाही सोडले नाही. राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या रामेटक मतदारसंघातील कन्हान नगर पालिकेत काँग्रेसने तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या सासूलाच शिवसेनेने सुनेविरुद्ध उभे केल आहे. आता साऱ्यांचे लक्ष या लढतीत लागले आहे. सासू सुनेवर मात करते किती सून वरचढ ठरले निकालानंतर दिसून येणार आहे.

कन्हान पिपरी नगरपालिकेच्या निवडणुकीत हा प्रकार घडला आहे. सासू गुंफा तिकडे या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांना पुन्हा काँग्रेस तिकीट देईल अशी आशा होती. त्या पूर्ण जोमाने कामाला लागल्या होत्या. मात्र काँग्रेसने त्यांना डावलले. त्यांच्या ऐवजी सून दर्शना तिडके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सासू-सुनेमध्ये घरामध्ये भांडणे होऊ लागली.

मुरब्बी असलेल्या सासूने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट शिवसेनेचा दरवाजा ठोठावला. माजी नगरसेविका आयत्या चालून आल्याने शिवसेनेतही उत्साह संचारला. त्यांनी संधी सोडली नाही. सासूबाईंनी लगेच तिकटी जाहीर करण्यात आहे. सासू सुनेच्या भांडणात मात्र मुलाचे चांगलेच हाल चालू आहेत.

Kanhan Municipal Election witnesses a rare political clash as mother-in-law Gumfa Tidke faces daughter-in-law Darshana Tidke
Talegaon Dabhade News: गड बिनविरोध! आता 'सिंहा' साठी झुंज; भेगडे -दाभाडेंचा कस लागणार

आईचा प्रचार करायचा का बायकोचा असा प्रश्न त्याला पडला आहे. शेवटी कोणीही जिंकले तरी सत्ता घरीच राहणार आहे. सासू गुंफा तिडके म्हणाल्या, काँग्रेसने आमच्या घरात भांडणे लावली. मी नगरसेविका होती. मला तिकीट नाकारण्याचे कारण नव्हते. मात्र काँग्रेसने सुनेला तिकीट दिले. आता आम्ही दोघींनी उमेदवारी दाखल केली आहे. सुनेला पराभूत केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे गुंफा तिडके म्हणाल्या.

आई मागील निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या विजयात आमचाही मोठा वाटा आहे. मी सुरुवातीपासूनच समाजसेवेत सक्रिय आहे. माझ्या कामाची दखल घेऊनच काँग्रेसने मला तिकीट दिले. मात्र सासूबाईंनी राजकारणाच्या मोहापायी शिवसेनेत प्रवेश केला आणि घराचे दोन तुकडे केल्याचे सून दर्शना तिडके यांचे म्हणणे आहे.

Kanhan Municipal Election witnesses a rare political clash as mother-in-law Gumfa Tidke faces daughter-in-law Darshana Tidke
CJI Surya Kant : नवे सरन्यायाधीश देणार 'तो' ऐतिहासिक निकाल; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला मिळणार कलाटणी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com