Satara Politic's : आमदार अतुल भोसलेंनी सांगितली महायुतीची निवडणूक स्ट्रॅटेजी; ‘जिथे महायुती शक्य नाही; तिथे मैत्रीपूर्ण लढती’

Local Body Election 2025 : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वयाची बैठक घेण्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
Atul Bhosale
Atul BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Karad, 25 June : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे. तसेच, ज्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढविणे शक्य नाही, अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्थानिक नेत्यांशी चर्चा करून घेण्यात येईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी सांगितले.

भाजपचे आमदार अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी कऱ्हाड शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सातारा जिल्ह्यातील निवडणूक रणनीतीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, भविष्यातील निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, त्यासाठी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी लवकरच चर्चा करणार आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वयाची बैठक घेण्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. सातारा (Satara) जिल्ह्यात महायुतीला फायदा होईल, असा तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.

आमदार भोसले म्हणाले, सध्या आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणी करणार आहोत. महायुती म्हणून सातारा जिल्ह्यात एकत्र लढण्याबाबत काय करता येईल, याचा अंदाज घेतला जात आहे. सातारा जिल्ह्यातील एखाद्या मतदारसंघात महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढविणे कठीण असेल, तर त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्याबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. त्यातून महायुतीला फायदा होईल, हे बघितले जाईल.

Atul Bhosale
Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव कारखान्याचा दुसऱ्या दिवशी पहिला निकाल आला, 1427 मतांनी मारली बाजी; अजितदादा विरुद्ध रंजन तावरेंमध्ये कोण पुढे?

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबतचा प्रस्ताव तयार केल्याची चर्चा आहे. मात्र, कर्नाटक सरकारचा तो प्रस्ताव मान्य होणार नाही, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना विनंती करण्यात येणार आहे. त्याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील आमदार विधानसभेत आपली भूमिका मांडतील, असेही भोसले यांनी नमूद केले.

Atul Bhosale
Malegaon Elections Result 2025 : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मोठी अपडेट, रंजन तावरेंचे चार उमेदवार आघाडीवर तर अजित पवारांचे ...

पश्चिम महाराष्ट्राला अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास धोका निर्माण होणार आहे, त्यामुळे तो प्रस्ताव रद्द करण्यात यावा, यासाठी भाजपच्या केंद्रातील नेत्यांशी चर्चा केली जाईल. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या भागात पावसाळ्यात महापुराचा धोका नेहमीच असतो, त्यामुळे महापुराच्या उपाययोजनाबाबत तयारी करण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com