Jayant Patil News:अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून फलटणचे आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी 'तुतारी' हाती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झाला. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतली नाही. ते कार्यक्रमाला देखील उपस्थित नव्हते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केले.
जयंत पाटील म्हणाले, 'देव कधी आपल्याला दिसत नसतो. तसा आपला रामही व्यासपीठावर दिसत नाही. पण संजीवराजेंच्या माध्यामातून तुम्ही हा धाडसी आणि चांगला निर्णय घेतलाय.'
रामराजे व्यासपीठावर नसले तर त्यांच्याच माध्यमातून आणि पाठींब्यातून संजीवराजे आणि आमदार चव्हाण यांनी हा निर्णय घेतल्याचे संकेत जयंत पाटील यांनी दिले. जयंत पाटील म्हणाले, लोकसभेनंतर मी सगळीकडं भाषण करून सांगायचो भारतीय जनता पक्षात राम राहिला नाही. जिथं जिथं रामाची मंदिरं आहेत. तिथं तिथं भाजप उमेदवाराचा पराभव झाला.
रामानेच भाजपचा पराभव केला. मग आमचा राम तिकडं कसा राहिलाय. पण परत योग्य ठिकाणी आपला राम जायला लागला आहे, असे म्हणत पाटलांनी संजीवराजेंच्या पक्षप्रवेशाला धाडसी निर्णय म्हटले.
जयंत पाटील म्हणाले, रामराजे यांच्याशिवाय आम्हाला करमायचे नाही, विधान परिषद असताना त्यांच्या दालनात गेल्याशिवाय आम्हाला विधानसभेत गेल्या सारखे आम्हाला वाटायचे नाही. तुमचा आणि पवारसाहेबांचा जिव्हाळा कधीच कमी होऊ शकत नाही. सगळा महाराष्ट्रा पवारसाहेबांच्या, 84 वर्षाच्या संघर्ष योद्धाच्या मागे उभा राहिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.