Prakash Abitkar News : आमदार खोसकरांनी मंत्री आबिटकरांना ओळखलेच नाही! अशी झाली फजिती...

MLA Hiraman Khoskar Health Minister : मुंबईतील आमदार निवास (आकाशवाणी) इमारतीमधील रूम नंबर 413 मध्ये प्रकाश आबिटकर यांचा सध्या मुक्काम आहे.
Prakash Abitkar, Hiraman Khoskar
Prakash Abitkar, Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कॅबिनेट मंत्री म्हटलं की कार्यकर्ते, अधिकारी, पोलिसांचा गराडा आलाच... राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर त्याला अपवाद आहेत. मंत्री म्हणून नव्हे तर एखादा कार्यकर्ता म्हणूनच ते येणाऱ्या प्रत्येकासोबत सोबत बोलतात, त्यांची विचारपूस करतात. त्यांचे राहणीमानही अगदी साधे. त्यांच्या या स्टाईलने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनाही चकवा दिला.  

मुंबईतील आमदार निवास (आकाशवाणी) इमारतीमधील रूम नंबर 413 मध्ये प्रकाश आबिटकर यांचा सध्या मुक्काम आहे. मुंबईमध्ये त्यांना अद्याप निवासस्थान मिळालेले नाही. आमदार असल्यापासूनच ते या छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतात. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी आपला मुक्काम हलवलेला नाही. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आमदार खोसकर या खोलीत आले. खोलीतील गर्दी बाजूला सारून ते मंत्री आबिटकर यांच्यापर्यंत पोहोचले.

Prakash Abitkar, Hiraman Khoskar
Shivsena UBT : 'जे गेले ते कोल्हे, कुत्रे', एकनाथ शिंदेंच्या मिशन टायगरवरून मोरेंची प्रतिक्रिया

अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आबिटकर यांचे लक्ष आमदार खोसकर यांच्याकडे गेले. खोसकर यांना पाहताच मंत्री आबिटकर हे ताडकन खुर्चीतून उठले. त्यांनी खोसकरांना नमस्कार केला. आमदार खोसकरांनी देखील मंत्री आबिटकरांना नमस्कार केला. मात्र, हेच आरोग्य मंत्री आबिटकर आहेत, याची कल्पना बहुदा आमदार खोसकरांना नव्हती. ते गोंधळात पडल्याचे दिसून आले.

मंत्री अबिटकर हे खुर्चीतून उठले, दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. आणि आमदार खोसकर यांनी मंत्री आबिटकर यांना सवाल केला. आरोग्यमंत्र्यांना भेटायचं आहे ते कुठे आहेत? त्याच क्षणी आबिटकर गंभीर झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आणि आबिटकर म्हणाले मीच आहे आरोग्यमंत्री. या दोघांच्या संभाषणामुळे त्यांच्यामध्ये आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Prakash Abitkar, Hiraman Khoskar
Maharashtra Politics: शरद पवारांच्या नेत्याची पुन्हा घरवापसी? नितीन गडकरींची घेतली भेट

आबिटकर हे कॅबिनेट मंत्री असले तरी अत्यंत साधे राहतात. साधा शर्ट आणि जीन्स घालतात. ते नेहमीच सर्वांशी कार्यकर्त्यांप्रमाणे मिळून मिसळून राहतात. ज्या ठिकाणी मंत्री असतात त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र आबिटकर यांच्या ठिकाणी कोणताच बंदोबस्त नव्हता. त्यांच्या आजूबाजूला लोकही नव्हते. त्यामुळे साहजिकच आमदार खोसकर यांना प्रश्न पडला असावा? हेच आबिटकर असू शकतात का?, त्यातूनच त्यांचा गोंधळ उडाला.

दरम्यान, आमदार खोसकर हे आपल्या मतदारसंघातील एका हॉस्पिटल संदर्भात काम घेऊन मंत्री आबिटकर यांच्याजवळ आले होते. साधारण दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाल्यानंतर आबिटकर यांनी देखील खोसकर यांच्या कामाला होकार दिला. पण निधी संदर्भातील चेंडू त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ढकलला. त्यावरून पुन्हा एकदा या दोघांमध्ये अशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com