Satara Political News : अजित पवारांची ‘दादागिरी’ रोखण्यासाठी भाजपचे उदयनराजे ‘कार्ड’..

Satara Lok Sabha : सातारा लोकसभेवरुन महायुतीत घमासान होण्याची शक्यता..
Ajit Pawar, Udayanraje Bhosale
Ajit Pawar, Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : सातारा लोकसभेसाठी सध्या इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे. अजून कोणत्याही आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्मूला ठरलेला नाही. अशातच भाजपच्या पक्ष निरीक्षकांनी उदयनराजेंनाच तिकिट द्यावे, अशी भूमिका मांडल्याने महायुतीतील शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादीच्या इच्छुक नेत्यांत अस्वस्थता पसरली आहे.

जिल्ह्यात महायुतीत एकमत नसल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. तर शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सातारा (Satara) लोकसभेवरुन महायुतीत घमासान होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा (Loksabha) मतदारसंघ सध्या राजकीय दृष्ट्या हॉट बनला आहे. भाजपने तर मागील निवडणुकीपासूनच बुथ पातळीवरुन तयारी केली आहे.

Ajit Pawar, Udayanraje Bhosale
Devendra Fadnavis On Jarange : मनोज जरांगेंचा मुंबईत धडकण्याचा इशारा; फडणवीस म्हणाले...

तर राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अजित पवार (Ajit Pawar) गटाला आपलाच वाटत आहे. शिंदे गट शिवसेनेने या मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क सांगितला आहे. या दावेबाजीमुळे महायुतीतील घटक पक्षात सातारा लोकसभेवरुन जुंपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे भाजपच्या इच्छुकांच्या यादीतील नावे आहेत.

तर राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील इच्छुक आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून पुरुषोत्तम जाधव यांनी देखील पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच कराडातील कार्यक्रमात भाजपच्या पक्ष निरीक्षकाने आपली 'मन की बात' बोलून दाखवत यावेळेसही सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंनाच तिकीट द्यावे, अशी मागणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मागणीमुळे जिल्ह्यातील शिंदे गट शिवसेना व अजितदादा गट राष्ट्रवादीच्या इच्छुकांत अस्वस्थता पसरली आहे. यातूनच जिल्ह्यात महायुतीत एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याची तयारी केली आहे. प्रत्येकजण सातारा लोकसभेवर दावा करु लागल्याचे चित्र आहे.

हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात आजपर्यंत शिवसेनेकडे राहिला आहे. 2019 ला भाजपने पोटनिवडणुकीत उदयनराजेंसाठी हा मतदारसंघ मागून घेतला होता. आता शिंदे गट शिवसेना हा मतदारसंघ सहजासहजी सोडणार नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने तर सातारा लोकसभेवर लक्ष केंद्रित केले असून तेही यासाठी आग्रही आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीत सातारा लोकसभेवरुन कळवंड लागण्याची शक्यता आहे. भाजपने उदयनराजेंना रिंगणात उतरविले तर त्यांना अजित पवार गट मदत करणार का, हा प्रश्न असून राष्ट्रवादीची ही मते शरद पवार गटाच्या उमेदवाराला जाण्याची भीती आहे. महायुतीच्या मतांचे विभाजन रोखण्यासाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीला समनियोजित तोडगा काढावा लागेल. अन्यथा सातारा लोकसभा मतदारसंघाचे मैदान शरद पवार गट राष्ट्रवादी मारुन महायुतीला दणका देऊ शकते.

(Edited by Amol Sutar)

Ajit Pawar, Udayanraje Bhosale
Ajitdada Vs Jayantrao : होय, मला विरोधी पक्षनेता व्हायचं होतं; पण अजितदादांनी... : जयंतरावांचं ‘त्या’ वादावर भाष्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com