Mahesh Shinde News : '...म्हणून शरद पवारांना 'यशवंत' विचारांवर बोलण्याचा अधिकारच नाही'; महेश शिंदेंची टीका!

Mahesh Shinde vs Sharad Pawar : जाणून घ्या, नेमकं असं का म्हणाले आहेत आमदार महेश शिंदे?
Mahesh Shinde vs Sharad Pawar
Mahesh Shinde vs Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. तर पुढील टप्प्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर खोचली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

अनेक मतदारसंघांबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. तर काही ठिकाणी राजकीय पक्षांकडून नवीन चेहऱ्यांना संधी देत,प्रस्थापितांना धक्का दिला जात आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना आता शिवसेना आमदार महेश शिंदे यांचंही एक विधान समोर आलं आहे. त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahesh Shinde vs Sharad Pawar
Ajit Pawar Vs Supriya Sule : अमेरिकेतील पत्रकारावरून ताई, दादा आमने-सामने; 'दादांचे ते वक्तव्य...' सुप्रिया सुळेंची टीका!

सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवार दिल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकार नाही, अशी कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी टीका केली आहे. शरद पवार गटाकडून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे आव्हान असणार आहे.

दरम्यान महेश शिंदे यांनी म्हटले आहे की, शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे त्यामुळे यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकारच नाही. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने पवारांना यशवंत विचाराचा विसर पडल्याचे दिसत आहे.

Mahesh Shinde vs Sharad Pawar
Sharad Pawar News : मोदींची हुकमशाही राजवट जनताच मोडून काढणार; पवारांनी व्यक्त केला विश्वास!

नवी मुंबई बाजार समितीच्या गाळ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांनी भ्रष्टाचार केल्याचा शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा आरोप आहे. याबाबत आज त्यांनी बाजार समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाने 300 रुपये स्क्वेअर फुटाने खरेदी केलेल्या गाळ्याबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com