आमदार महेश शिंदेंना `बॅक टू ब्राझील` करणार : शशिकांत शिंदेचे आव्हान...

हे सरकार चांगले चालले पाहिजे, या भावनेपोटी दोन वर्षे काही बोललो नाही. गेली दोन वर्षे आणि आजही आघाडी धर्माशी बांधील आहे. एकदा-दोनदा सहन करेन, राष्ट्रवादीवर टीका कराल, तर जागा दाखवू," असा इशारा शशीकांत शिंदे यांनी दिला.
Shashikant Shinde, Mahesh Shinde
Shashikant Shinde, Mahesh Shindesarkarnama
Published on
Updated on

कोरेगाव : सध्याच्या आमदारांनी कोविडमध्ये चांगले काम केले, चांगल्या कामाचे आम्ही कौतुकच करतो. आम्ही पण कोविडमध्ये थोडेसे काम केले. पण, त्यासाठी पैसे घेतले नाहीत. पैसे कमावण्याचा धंदा करत असाल, तर उघडे पाडू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून दिला. दरम्यान, अपघाताने झालेले आमदार अपघातानेच जातील. अधिकाऱ्यांना बाहेर पाठवण्याची भाषा करणाऱ्यांनाच बाहेर 'बॅक टू ब्राझील' पाठवू, असा टोलाही त्यांनी लगावला.

कटापूर (ता. कोरेगाव) येथे आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार, तर शशीकांत शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुनील माने, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळसकर, प्रदीप विधाते, शहाजी क्षीरसागर, राजाभाऊ जगदाळे, भास्कर कदम, उपस्थित होते.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
मेडिकल कॉलेजच्या जागेसाठी लोकांवर अन्याय; आमदार महेश शिंदे याचिका दाखल करणार

आमदार शशीकांत शिंदे म्हणाले, "कोविडच्या औषधांसाठी दुकान एकच, रेमडेसिव्हर इंजेक्शन शासनाचे, मात्र ते मिळायचे 'त्या' एकाच दुकानात, रुग्ण अत्यवस्थ झाला, की पंढरपूरला रवानगी. पैसे कमावण्याचा धंदा करत असाल, तर उघडे पाडू. माझा पराभव जिल्ह्याच्या राजकारणातून अपघाताने झाला. गेल्या २५ वर्षांच्या राजकारणात मी गर्व केला नाही. पण दीड वर्षातच त्यांच्या डोक्यात हवा गेली. माझ्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस केल्या.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
'राष्ट्रवादी'च्या कार्यालयावरील हल्ल्याने आमदार शशीकांत शिंदे संतप्त; ते म्हणाले....  

अपघाताने झालेले आमदार अपघातानेच जातील. अधिकाऱ्यांना बाहेर पाठवण्याची भाषा करणाऱ्यांनाच बाहेर, 'बॅक टू ब्राझील' पाठवू. खायचं एकाचं, गायचं दुसऱ्याचं, भाजपचा राजीनामा द्यायला लावून कार्यकर्त्याला नियोजन मंडळावर घेतले. हे सरकार चांगले चालले पाहिजे, या भावनेपोटी दोन वर्षे काही बोललो नाही. गेली दोन वर्षे आणि आजही आघाडी धर्माशी बांधील आहे. एकदा-दोनदा सहन करेन, राष्ट्रवादीवर टीका कराल, तर जागा दाखवू."

Shashikant Shinde, Mahesh Shinde
राष्ट्रवादीच्या आमदारानं दिलं थेट 'ईडी'ला आव्हान

कोविड योद्ध्यांचा सन्मान खऱ्या कोविड योद्ध्याच्या हस्ते व्हावा, म्हणून आमदार निलेश लंके यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. ते देखील पूर्वी शिवसेनेत होते. मात्र, इकडच्यांसारखे 'आधे इधर, आधे ऊधर', असे ते नाहीत." जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता आणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार शशिकांत शिंदे हे या मतदारसंघापुरते नेते नाहीत, तर ते राज्याचे नेते आणि आमचे उर्जा स्थान आहेत, असे नमूद करून निलेश लंके म्हणाले, "वाघ दोन फूट मागे आला, तर तो तेवढीच मोठी झेप घेतो. असे हे संघर्षशील, अष्टपैलू नेतृत्व आहे.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
जयंत पाटील म्हणाले, माणुसकीच नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवले..

नगर येथील माझ्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोडून मी येथे आलो आहे. यापुढेही त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी येणार आहे." नुसती उद्घाटने करून कोणी नेता होत नाही. दिवसा उद्घाटने करा, शशिकांत शिंदे यांच्या कामाचीही उद्घाटने करा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी कटापूर येथील बॅरेजजवळ 'जिहे-कटापूर'चे पाणी पूजन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com