सातारा : सक्तवसूली संचालनालयाकडून (ED) मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित साखर कारखाना, मंत्री हसन मुश्रिफ(Hasan Mushrif), माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याविरोधात पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी थेट ईडीला आव्हान दिलं आहे.
शिंदे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी देशमुख यांच्यास मुश्रिफ व अजित पवारांविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याविरोधा रोष आहे. कटापूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी सोमय्या यांच्यावर टीका करत ईडी, प्राप्तीकर विभागाला आव्हान दिलं. भाजपच्या ईडाल पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले.
जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या सोमय्यांबाबत अजित पवार यांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो. नाहीतर त्यांचा तोतरेपणा बाहेर काढला असता. मी पुढील परिणामांचा विचार करत नाही. ED आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नाही, असं शिंदे म्हणाले.
सोमय्या आज जाणार ईडी कार्यालयात
दरम्यान, आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या बुधवारी (ता. 20) सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) च्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात घोटाळा केल्याचे आरोप त्यांनी यापूर्वीच केले आहेत. त्याबाबतचे पुरावे आपण सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
''आज दुपारी 2 वाजता मी जरंडेश्वर साखर कारखाना शेतकरी/संस्थापकांसह ईडी मुंबईच्या अधिकाऱ्यांना अजित पवार यांचा बेनामी भ्रष्ट व्यवहारासाठी भेटणार,'' असे ट्विट करत किरीट सोमय्या यांनी केले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सोलापूर दौऱ्यादरम्यान किरीट सोमय्या यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. अजित पवार यांच्या बहिणी जरंडेश्वर कारखान्यात भागीदार आहेत. याबाबतचे सर्व पुरावे मी ईडीकडे (ED) सुपूर्द करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.