Solapur Dcc Bank : सचिन कल्याणशेट्टींनी वाढविले रणजितसिंह मोहिते पाटलांचे टेन्शन; सलग तीन टर्म जिंकलेल्या मतदारसंघाच्या विजयाची चावी भाजप आमदाराच्या हाती

Sachin Kalyanshetti Vs Ranjitsinh Mohite Patil : सोलापूर जिल्हा बँकेच्या कृषी पणन मतदारसंघात सचिन कल्याणशेट्टींच्या २३ नव्या संस्थांचा समावेश झाला. एकूण ११२ मतदारांपैकी २४ संस्थांवर वर्चस्व मिळाल्याने रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात नवी राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत.
Ranjitsinh Mohite Patil-Sachin kalyanshetti
Ranjitsinh Mohite Patil-Sachin kalyanshettiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 24 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सर्वांत सुरक्षित आणि कमी मतदार असलेला मतदारसंघ म्हणून कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघाकडे पाहिले जाते. सोलापूर डीसीसी बँकेत सलग तीन टर्मपासून माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील या मतदारसंघातून संचालक झाले आहेत. मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या २३ संस्थांचा समावेश झाला आहे. एकूण ११२ मतदारांपैकी पूर्वीची एक आणि नव्याने समाविष्ट झालेल्या २३ अशा २४ संस्थांवर आता आमदार कल्याणशेट्टी यांचे वर्चस्व असल्याने ते या मतदारसंघाचे नवे ‘बॉस’ ठरण्याची शक्यता आहे.

कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघात पूर्वी केवळ अक्कलकोट तालुका खरेदी-विक्री संघ या एकमेव संस्थेचा समावेश होता. अंतिम मतदार यादीत आता अथर्व, अनंत, अनंतचैतन्य, अल्लमप्रभू, एकदंत, कानोसतीमाता, गंगाराम, गुरुमडिवाळेश्वर, टायगर, बुद्धदर्शन, महात्मा बसवेश्वर, यमाईदेवी, रेवणसिद्धेश्वर, लोकमान्य उद्योग समूह, लोकसहमत, विश्वकर्मा, शिऊ, श्रीगणेश, सिद्धरामेश्वर, सम्यक, सोनल, स्वस्तिक आणि हिंगलाज या २३ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थांचा समावेश झाला आहे.

या मतदारसंघातून मतदार प्रतिनिधी म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह मनोज कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी आणि मीलन कल्याणशेट्टी यांचे ठराव झाले आहेत. डीसीसी बँकेच्या जागावाटपात ही जागा आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

अवाक् करणारी खेळी

जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली, त्यावेळी या संस्थांचा समावेश नागरी बँका व इतर संस्था मतदारसंघात झाला होता. आपला समावेश पणन संस्था मतदारसंघात करावा, अशी हरकत अक्कलकोटमधील २३ संस्थांनी विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे घेतली.

Ranjitsinh Mohite Patil-Sachin kalyanshetti
Solapur Dcc Bank : शिंदे बंधू अन्‌ परिचारकांनी अखेर क्षणी बाजी पलवटली; मोहिते पाटलांना धोबीपछाड देत दुग्ध मतदारसंघात मिळविले वर्चस्व

या संस्थांच्या वतीने ॲड. उमेश मराठे आणि ॲड. समर्थ दरेकर यांनी बाजू मांडली. या संस्थांची हरकत सहनिबंधकांनी मान्य केली. त्यामुळे डीसीसी बँकेच्या अंतिम मतदार यादीत या संस्थांचा समावेश पणन मतदारसंघात झाला आहे.

सहनिबंधकांच्या आदेशान्वये अक्कलकोटच्या २३ संस्थांचा पणन मतदारसंघातील समावेश कायम राहिला आहे. या मतदारसंघात पूर्वी माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे वर्चस्व होते. आता आमदार कल्याणशेट्टी यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. दिग्गजांना थक्क करणारी ही खेळी आमदार कल्याणशेट्टी यांनीच खेळल्याचे समोर आले आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Sachin kalyanshetti
Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत रात्रीच्या घडामोडींवर खासदार लंकेंचे गंभीर प्रश्न; सीसीटीव्ही फुटेजचा गोंधळ, वाद पेटणार?

तालुकानिहाय मतदार

अक्कलकोट : २४, माळशिरस : १९, माढा : १८, बार्शी : १२, सांगोला : १०, मंगळवेढा : ९, पंढरपू्र : ६, करमाळा : ५, मोहोळ : ४, उत्तर सोलापूर : ३, दक्षिण सोलापूर : २ एकूण : ११२

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com