Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत रात्रीच्या घडामोडींवर खासदार लंकेंचे गंभीर प्रश्न; सीसीटीव्ही फुटेजचा गोंधळ, वाद पेटणार?

Nilesh Lanke Seeks CCTV Footage Over Ahilyanagar Bank Election Dispute : उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेवर आक्षेप; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यालय रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू असल्याचे सांगितले.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar Bank Election News : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत, राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहकार परिवर्तन पॅनलचे नेते, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी विरोधकांना घेरण्यास सुरूवात केली आहे.

खासदार लंकेंनी प्रशासकीय पातळीवरून डाव टाकला असून, उमेदवारी मागे घेण्याचा प्रकार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता असा आरोप करत, निवडणूक कार्यालयातील सीसीटीव्हीची मागणी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.

खासदार नीलेश लंके यांनी, "अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी (DCC Bank) मागे उमेदवारी घेण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. मात्र रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. याच्या पडताळणीसाठी निवडणूक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली. परंतु, सीसीटीव्ही नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार गंभीर असून, याबाबत तक्रार करणार आहे."

खासदार लंके (Nilesh Lanke) आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांची भेट घेऊन यासंदर्भात तक्रार केली. यानंतर खासदार लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "जिल्हा बँकेच्या काही उमेदवारांनी रात्री उशिराने अर्ज मागे घेतले गेले. रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालय सुरू होते, अशी माहिती आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निःपक्षपातीने कामकाज केले पाहिजे."

Nilesh Lanke
Ahilyanagar District Bank Election : विखे-थोरातांच्या सहमतीने समीकरणे बदलली; राम शिंदेंना दिलासा, एकटे पडलेल्या लंकेंची कोंडी?

दहा जागांसाठी मतदान होत असताना, मतदानाच्यावेळी सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी करताना मतदान केंद्रावरही गोंधळ होण्याची शक्यता आहे. मतपेट्यांची वाहतूक करताना वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत पॅनलचे प्रतिनिधीं उपस्थित राहतील, तशी परवानगी मागितली जाणार असल्याचे खासदार लंकेंनी सांगितले.

Nilesh Lanke
Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर बँकेत विखे-थोरातांची बाजी; राम शिंदे, नीलेश लंके यांच्यासमोर आव्हान!

खासदार लंकेंचा गंभीर आरोप

खासदार लंके यांनी, पुढे गंभीर आरोप करताना, उमेदवारी माघारीसाठी तीन वाजेपर्यंत मुदत होती. मात्र रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचा राबता होता. रात्री साडेसात वाजेपर्यंत शेतीपूरक मतदारसंघातील उमेदवार सुधीर म्हस्के यांचा विरोधक शोध घेत होते. त्यांच्यासाठी उशिरापर्यंत कार्यालय कसे सुरू ठेवता, असा प्रश्न केला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले...

निवडणूक कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खासदार लंके यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता सीसीटीव्ही बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. यावरून पुढे मोठ पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी, उमेदवारी माघारीसाठी तीन वाजेच्या आधी कार्यालयात आलेल्यांची अर्ज माघारीची प्रक्रिया रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होती. रात्री उशिराने कोणाचाही अर्ज मागे घेतलेला नाही. कार्यालय आठ वाजेपर्यंतच सुरू होते असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com