
Solapur, 22 August : आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली तथाकथित गोरक्षकांकडून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात शेतकरी, व्यापारी, पशुपालक कृती समितीच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना सदाभाऊ यांनी आपल्या जुन्या शैलीत तथाकथित गोरक्षकांची धुलाई केली. ‘अरे धमक्या कोणाला देता? शेतकऱ्यांच्या पोरांना? तुम्ही माझ्या वाटेला गेला तर तुमच्या XXX नांगराळाचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा,’ असा इशाराही खोत यांनी दिला.
आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) म्हणाले, शेतकऱ्यांनी कधीही देशी आणि खिलार गाय विकायला बाजारात आणली नाही, हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. आपण कधी देशी किंवा खिलार गाय बाजारात विकायला आणली आहे का? अरे, देशी गाईची कधीही विक्री होत नाही.
या लोकांनी (गोरक्षक cow vigilantes म्हणवून घेणाऱ्यांनी) जेव्हा गाड्या अडवायला चालू केल्या. त्यानंतर मी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला लागलो, तर मला धमक्या यायला सुरू झाल्या, असे सांगून अरे धमक्या कोणाला देता? शेतकऱ्यांच्या पोरांना? म्हणून मी आज नांगराळाचा फाळ आणलाय. तुम्ही जर माझ्या वाटेला गेला, तर तुमच्या XXX. नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. लय गडी भेंडाळले होते, तुमचं राहायलाय, असे सांगून आमदार सदाभाऊ खोत यांनी तथाकथित गोरक्षकांना इशारा दिला.
‘शो’ची कुत्री पाळणाऱ्या शहरातील लोकांनी आम्हाला गाईवर प्रेम करायचे शिकवू नये. शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गाड्या अडवून तथाकथित गोरक्षक त्यांची लूट करीत आहेत. शेतकऱ्यांच्या गाड्या अडविणारे गोरक्षक नसून गोभक्षक आहात. आम्हीही आता गावोगावी शेतकऱ्यांची ‘गोपालक सेना’ उभी करणार आहोत, असा इशारा खोत यांनी दिला.
जे लोक गोरक्षक म्हणून कायदा हातात घेतात, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कायदाचा गैरवापर करून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करू नयेत. गोवंशहत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्यात यावी आणि त्यात एचएफ आणि होमिजीनाईजड पाश्चात्य आणि संकरीत बैलांच्या कत्तलीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणहीही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
जनावरांच्या गाड्या अडविण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या गाई-म्हशींचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडला आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांच्या विक्रीत कोणीही अडथळा आणल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल. शेतकऱ्यांच्या जनावरांचे बाजार बंद करण्याचा डाव आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही खोतांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.