Vishwajeet Kadam : विश्वजित कदम यांनी घेतली शरद पवारांची भेट; काय आहे कारण?

Western Maharashtra Politics : सांगली काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनीही आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवारांना भेटण्यासाठी कदम यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’ गाठले. त्यांनी ही भेट का घेतली, याची चर्चा सुरू असतानाच पवार-कदम भेटीचे कारण पुढे आले आहे.
Vishwajeet Kadam-Sharad Pawar
Vishwajeet Kadam-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 26 September : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भेटीगाठीतून अनेक राजकीय समीकरणे जुळवली जात आहे. काहींची राजकीय गणिते बिघडवली जात आहेत. काँग्रेसचे युवा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनीही आज (ता. 26 सप्टेंबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे.

विधानसभा निवडणूक (Assembly Election)लढवू इच्छिणारे अनेकजण नेतेमंडळींना भेट आहेत. उमेदवारीची मागणी करतानाच नवी राजकीय गणितेही आखली जात आहेत. अनेक इच्छूक एकापेक्षा जास्त ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोण कोणाकडून निवडणूक लढविणार, याची शाश्वती शेवटपर्यंत येताना दिसत नाही.

दरम्यान, सांगली काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनीही आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवारांना भेटण्यासाठी कदम यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’ गाठले. त्यांनी ही भेट का घेतली, याची चर्चा सुरू असतानाच पवार-कदम भेटीचे कारण पुढे आले आहे.

Vishwajeet Kadam-Sharad Pawar
Dharmraj Kadadi : काडादींनी वाढविले महाआघाडीतील इच्छुकांचे टेन्शन; ‘दक्षिण’च्या रणांगणात उतरण्याचे थेट संकेत

शरद पवार हे येत्या 4 ऑक्टोबर रोजी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे येत्या चार ऑक्टोबर रोजी अनावरण होणार आहे. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

Vishwajeet Kadam-Sharad Pawar
Ulhas Pawar: संजय गांधींनी माझ्या गळ्यात 100 रुपयांच्या नोटांचा हार घातला, अन् म्हणाले '...आपको कोई मदत नही करता!'

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते शरद पवार यांना येऊन भेट आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते असलेले विश्वजित कदम यांची भेटही अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com