Kolhapur Politic's : कोल्हापूरकरांच्या रडारवर आता आमदार; कृती समितीचे चॅलेंज स्वीकारणार का? उपमुख्यमंत्र्यांनाही बैठकीला मुहूर्त मिळाला

Kolhapur city extension Issue : गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत निर्णय न झाल्याने कृती समितीकडून वारंवार आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. मात्र, कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या खासदार,आमदारांचीच राजकीय इच्छा नसल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे.
Kolhapur Corporation
Kolhapur CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 22 March : कोल्हापूरला महानगरपालिका झाल्यापासून 70 वर्षांत एकदाही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे विकास कामांबरोबर मूलभूत सुविधांची वानवा कोल्हापूर शहरात पाहायला मिळत आहे, त्यामुळे आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेल्या शहरवासीयांनी आता निर्णायक टप्प्यावर आंदोलन करण्याची तयारी ठेवली आहे. शहर हद्दवाढ कृती समितीच्या रडारवर आता आमदाराच आले आहेत, त्यांना समितीने खुले चॅलेंज दिले आहे, ते आता आमदार स्वीकारणार का? हे पाहावे लागणार आहे.

कोल्हापूर शहरातील (Kolhapur city ) एकाही आमदाराने आजपर्यंत शहर हद्दवाढीचा विषय विधानसभेत मांडलेला नाही. येत्या रविवारी (ता. 23 मार्च) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हद्दवाढीच्या संदर्भात कृती समितीकडून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात शहरातील आमदारांनी आपली भूमिका मांडावी, अन्यथा हद्दवाढीला त्यांचा विरोध समजू, असा इशारा कृती समितीकडून देण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत निर्णय न झाल्याने कृती समितीकडून वारंवार आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. मात्र, कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या खासदार,आमदारांचीच (MP, MLA) राजकीय इच्छा नसल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. राजकीय नेत्यांकडूनच ग्रामीण आणि शहरी असा वाद निर्माण केला जात आहे. त्यामुळे आता हद्दवाढ कृती समितीकडून निर्णय टप्प्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Kolhapur Corporation
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांनी एकाच शब्दात विषय संपवला....

ग्रामीण आणि शहर असे न मानता सर्वांनाच विचारात घेऊन कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, त्याची सुरुवात खासदार, आमदारांनी करावी, अशी मागणी आता कृती समितीने केली आहे. यापूर्वी हद्दवाढीची चर्चा सुरू होत असताना काही आमदारांकडून विरोध होत होता, त्यामुळे आता समन्वयानेच आमदार आणि खासदारांनी आपली भूमिका मांडावी. त्याची सुरुवात त्यांनीच करावी, अशी मागणी कृती समितीने करत येत्या रविवारी (ता. २३ मार्च) आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Kolhapur Corporation
Ajitdada on Munde Resign : धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याअगोदर ‘देवगिरी’वरील बैठकीत काय घडलं...कोण, कोण उपस्थित होतं?; खुद्द अजितदादांनी केला उलगडा

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, यासाठी सरकारी पातळीवर बैठक आयोजित करण्याची मागणी कृती समितीसह लोकप्रतिनिधींकडून होत होती. त्याला आता मुहूर्त मिळाला असून सोमवारी (ता. 24 मार्च) उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com