Ambedkar On Modi PM : मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत आंबेडकरांचे मोठे विधान; म्हणाले, ‘२०२४ नंतर मोदी पंतप्रधान...’

Prakash Ambedkar : या एकमेव बदलामुळे देशातील भीतीचं वातावरण निवळेल
Narendra Modi-Prakash Ambedkar
Narendra Modi-Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर कोणाचं सरकार येईल, हे सांगू शकत नाही. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केला. (Modi will not become PM after 2024 Lok Sabha elections: Prakash Ambedkar)

प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) हे आज अक्कलकोटच्या दौऱ्यावर हेाते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी यांच्या पंतप्रधानपदाबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, कर्नाटकचा निकाल त्यांना पचवता आलेला नाही. त्या निकालातून भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे.

Narendra Modi-Prakash Ambedkar
Shasan Aaplya Dari : जेजुरीसाठी ३५९ कोटी मंजूर; १०९ कोटी कामांचे भूमिपूजन ; मुख्यमंत्र्यांची माहिती

आगामी निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पंतप्रधान होणार नाहीत. या एकमेव बदलामुळे देशातील भीतीचं वातावरण निवळेल. फक्त लोकसभेची निवडणूक होईपर्यंत सहन करा, त्यानंतर हळूहळू शांतता प्रस्थापित होईल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

आंबेडकर म्हणाले की, गेली १० वर्ष भाजप आणि आरएसएसचं राज्य आपण पाहतोय. या कालावधीमध्ये मॉब लिचिंगपासून एखादा ट्राईब नष्ट करणे असा कारभार सुरु झाला आहे. आम्ही बदलाचं राजकारण केल म्हणून सांगत आहेत. मात्र ५०८ स्टेशनं नूतनीकरण करणार आहेत. जी रेल्वे स्टेशन आहेत, तेच दुरुस्त होणार आहे आणि त्याला २४ हजार कोटींचा खर्च होणार आहे. ज्या ठिकाणी स्टेशन नाही, तिथं स्टेशनं बांधायचं सोडून दिलं आहे.

Narendra Modi-Prakash Ambedkar
Eknath Shinde Reply to Thackeray: देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नव्हे; तर मास्टर ब्लास्टर; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मणिपूरसारखं शांततेच राज्य अशांततेत घालविण्यात आलं आहे. देशभरामध्ये पुन्हा नव्याने दंगली होण्याची शक्यता आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये विभाजन झालं आपलं सरकार पुन्हा येईल, असं भाजपला वाटतंय. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी किंवा मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी असा विवाह झाला असेल तर त्याचा शोध घेणं सुरू आहे आणि त्याला ‘लव्ह जिहाद’चं नाव दिलं जात आहे, असा दावाही आंबेडकरांनी केला.

Narendra Modi-Prakash Ambedkar
Bagal Group With BJP: रश्मी बागल पुण्यात अमित शहांच्या व्यासपीठावर; बागल गट भाजपच्या वाटेवर

ते म्हणाले की, आबू आझमींबद्दल मला काही वाटत नाही. पण, देवेंद्र फडणवीस हे विसरले आहेत की, निवडून आलेला माणूस हा नोकर असतो आणि मतदार हा मालक असतो. त्यामुळं मालकाने फडणवीस यांना कायदा करण्याचा अधिकार दिलेला नाही. आम्ही नोकर नाही, आम्ही हुकूमशाह आहोत, ही त्यांची वृत्ती आहे आणि ती लोकशाहीच्या माध्यमातून येत आहे. निवडून आणणाऱ्या लोकांनी लग्न कोणाशी करायचे, हे ठरवण्याचा अधिकार दिलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com