Bazar Samiti Result : पुण्यात अजितदादांना धक्का : बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागांवर सर्वपक्षीयांचा विजय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवात पक्षाच्या बंडखोरांचे मोठे योगदान आहे.
Haveli Bazar Samiti Result
Haveli Bazar Samiti ResultSarkarnama

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पर्यायाने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) पुरस्कृत पॅनेलने बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागा जिंकत वर्चस्व मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवात पक्षाच्या बंडखोरांचे मोठे योगदान आहे. (NCP suffered defeat in Pune Bazar Samiti Election)

गेली १९ वर्षापासून प्रशासनाच्या ताब्यात असलेली पुणे बाजार समिती सहज ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वपक्षीय आघाडीने धोबीपछाड देत समितीवर आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे.

Haveli Bazar Samiti Result
Bazar Samiti Result : सावंतांना माढ्यात पराभवाचा धक्का : राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंची १८ जागा जिंकत विजयी घौडदौड कायम

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे बाजार समितीच्या निवडणूकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने पंधरापैकी तेरा जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचा दारूण पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. हमाल, मापाडी आणि तोलार मतदारसंघातून तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

Haveli Bazar Samiti Result
Bazar Samiti Results : दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का; बाजार समितीत फिफ्टी-फिफ्टी

बाजार समितीच्या सेवा सहकारी मतदार संघातील सर्वच्या सर्व सात जागांवर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यामध्ये रोहिदास उंदरे, दिलीप काळभोर, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, प्रकाश जगताप, नितीन दांगट, दत्तात्रेय पायगुडे हे उमेदवार निवडून आले आहेत.

Haveli Bazar Samiti Result
Bazar Samiti Result : मंचरमध्ये वळसे पाटलांना दे धक्का : राष्ट्रवादीचे बंडखोर निकम विजयी, सत्ता मात्र महाविकास आघाडीची

शेतकरी आघाडीचेच इतर मागासवर्ग गटातून शशिकांत गायकवाड, भटक्या विमुक्त मतदार संघातून लक्ष्मण केसकर, महिला राखीव मतदार संघातून मनिषा हरपळे व सारिका हरगुडे, तर ग्रामपंचायत मतदार संघातून सुदर्शन चौधरी व रवींद्र कंद हे उमेदवार विजयी झाले आहेत. बाजार समितीमधील विजयाने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, यातील सर्वपक्षीय अघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये बहुतांश राष्ट्रवादीचे बंडखोर विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला मात्र केवळ ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागा मिळविण्यात यश मिळाले आहे. रामकृष्ण सातव आणि आबासाहेब आबनावे हे त्यांचे निवडूण आलेले दोन उमेदवार आहेत.

Haveli Bazar Samiti Result
Bazar Samiti Election : जामनेरमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजनांचा बोलबाला : सात जागांवर विजय; ११ ठिकाणी आघाडी

हमाल मापाडी मतदारसंघातून संतोष नांगरे यांनी ८८८ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी हमाल मापाडी महामंडळाचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांचे उमेदवार राजेंद्र चोरघे या उमेदवाराचा पराभव केला. त्यांना ४०३ मते मिळाली. त्या खालोखाल गोरख मेंगडे ३१४ मते मिळाली. आडते व्यापारी गटातून जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. गणेश घुले यांना ५ हजार ८५२ एवढी मते तर अनिरुद्ध भोसले यांना ५ हजार ८१६ मते मिळाली आहेत.

ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण मतदार संघातून ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव यांनी ४०५, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी यांनी २५६ मते मिळवून विजय मिळवला. याच मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती गटातून राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे यांनी ३०७ तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून शेतकरी विकास आघाडीचे रवींद्र कंद यांनी ३७५ मते घेवून विजय मिळवला.

Haveli Bazar Samiti Result
Bazar Samiti Result : प्रशांत परिचारकांचा अभिजित पाटलांना धक्का : पंढरपूर बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय

सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून भाजपा पुरस्कृत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सर्वसाधारण गटातील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पुणे बाजार समितीचे माजी सभापती रोहीदास ऊंद्रे यांनी सर्वाधिक १ हजार ३२, माजी सभापती दिलीप काळभोर यांनी ८०५, ठाकरे गटाचे प्रशांत काळभोर यांनी ८८०, माजी संचालक राजाराम कांचन यांनी ८५४, माजी सभापती प्रकाश जगताप यांनी ९३९ , नितीन दांगट यांनी १ हजार १९, दत्तात्रय पायगुडे यांनी ८३० मते मिळवून विजय मिळवला.

इतर मागास प्रवर्गातील शशिकांत गायकवाड यांनी ८६०, भटक्या जाती विमुक्त जमाती गटातून लक्ष्मण केसकर यांनी ८७९, महिला राखीव मतदार संघातून मनिषा हरपळे यांनी १ हजार ७६ तर सारिका हारगुडे यांनी ८६८ मते घेऊन विजय संपादन केला. हरगुडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, महापालिकेतील माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या पत्नी सरला चांदेरे यांचा पराभव केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com