

Solapur, 24 September : लोकसभा निवडणुकीनंतर अकलूजचा ‘शिवरत्न’ बंगला पुन्हा एकदा गर्दीने फुलला. केवळ माळशिरस तालुक्यातील पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक असूनही समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह माहिते पाटील यांनी या मेळाव्यातून कोणतीही राजकीय टीकाटिपण्णी न करता कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यातून मोहिते पाटलांनी ‘पदवीधर’ची निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने मोहिते पाटील यांनी आज (ता. २४ सप्टेंबर) अकलूजमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आदमार रणजितसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, ॲड. प्रकाश पाटील ॲड मिलिंद कुलकर्णी यांच्यासह माळशिरस तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते आणि समर्थकांनीही गर्दी केली होती.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवरत्न बंगला गर्दीने फुलला होता. त्या निवडणुकीपासून कोणत्याही राजकीय व्यासपीठावर न दिसणारे रणजितसिंह मोहिते पाटील हे प्रथमच अकलूजमध्ये जाहीर व्यासपीठावरून मार्गदर्शन करणार होते. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सक्रीय कार्यक्रमात हजेरी लावण्यासोबत गाठीभेटींवरही भर दिला आहे.
सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांत सव्वा कोटींपेक्षा अधिकार पदवीधर आहेत. पण सव्वा लाख पदवीधारांची मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे. सगळ्यात कमी नोंदणी सोलापूर जिल्ह्यात झाली आहे. त्यात माळशिरस तालुका पिछाडीवर आहे. त्यामुळे पदवीधरांनी येत्या दोन दिवसांत जास्तीत जास्त नोंदणी करावी. आपल्यासोबत नातेवाईकांनाही मतदार नोंदणीसाठी आवाहन करावे, असा सल्ला या वेळी देण्यात आला.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीकरिता आता फक्त दोनच दिवस उरले आहेत. पदवीधरांनी आपल्यासोबत आपल्या नातेवाईकांचेही अर्ज भरावेत, असे माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
या वेळी प्रा. साठे यांनी मतदान नोंदणीसाठी अर्ज कसा भरावा, याविषयी मार्गदर्शन करीत मतदार नोंदणीसाठी रहिवासी पत्त्याचा दाखला, २०२२ किंवा त्यापूर्वीचे पदवीचे प्रमाणपत्र आयडेंटी कार्ड साइज फोटो, मोबाईल नंबर आदी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.