Jaysinh Mohite Patil : माढ्यातून विधानसभा लढविण्याबाबत जयसिंह मोहिते पाटील यांचे मोठे विधान...

Assembly Election 2024 : मोहिते पाटील कुटुंबातील कोणी जर माझा शब्द मोडून माढ्यातून निवडणूक लढवणार असेल, तर आपण त्याला विरोध करू, असा इशाराही त्यांनी स्वयकीयांना दिला आहे.
Jaysinh Mohite Patil
Jaysinh Mohite Patil Sarkarnama

Pandharpur, 06 June : माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील निवडणूक लढविणार, अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. मात्र, मोहिते पाटील कुटुंबातील सर्वेसर्वा जयसिंह मोहिते पाटील यांनी त्यावर थेट भाष्य केले आहे. मोहिते पाटील कुटुंबातील कोणीही माढा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही. पण माढ्यातीलच कार्यकर्त्यालाच संधी दिली जाईल, त्यालाच आपण आमदार करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मोहिते पाटील (Mohite Patil) कुटुंबातील कोणी जर माझा शब्द मोडून माढ्यातून निवडणूक लढवणार असेल, तर आपण त्याला विरोध करू, असा इशाराही त्यांनी स्वयकीयांना दिला आहे. त्यामुळे माढ्यातून (Madha) मोहिते पाटील विधानसभेची निवडणूक (Assembly Election) लढविणार की नाही, याबाबतचा संभ्रम वाढला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदार संघातून 1 लाख 20 हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. मोहिते पाटील यांच्या विजयात माढ्याचा मोठा वाटा असून माढ्यातून तब्बल 52 हजारांचे लीड मिळाले आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदासंघ पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील हे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या चर्चांना जयसिंह मोहिते पाटील यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

माढ्यातून स्वरूपाराणी मोहिते पाटील किंवा शिवतेजसिंह मोहिते पाटील हे विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू होती. माढा लोकसभा निकालानंतर त्या चर्चांना पेव फुटले आहे. मात्र, जयसिंह मोहिते पाटील यांनी मात्र मोहिते पाटील कुटुंबातील कोणीही माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Jaysinh Mohite Patil
Rajan Patil : राजन पाटलांची प्रथमच पीछेहाट; मोहोळमधून काँग्रेसला सर्वाधिक लीड!

माढ्यातील स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल आणि त्याला आमदार केले जाईल. माझा शब्द डावलून मोहिते पाटील कुटुंबातील कोणी माढ्याची निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपला विरोध असेल, असेही जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. जयसिंह मोहिते पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतर माढ्यात शिंदेंच्या विरोधात कोण उमेदवार असणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

जानकर माळशिरसचे उमेदवार?

भाजपने उमेदवारीमध्ये डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेत माढ्यातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोहिते पाटील 1 लाख 20 हजार मतांच्या फरकाने निवडून आले. पण या निवडणुकीत अनेक नवी समीकरणं जुळली आहेत. माळशिरसमधील कट्टर विरोधक उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय मैत्री झाली. जानकरांनीही मोहिते पाटील यांना साथ दिली. मोहिते पाटलांना लोकसभेला, विधानसभेला जानकरांना उमेदवारी देण्याचा दोन्ही गट एकत्र आल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे जानकर हे माळशिरसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Edited By : Vijay Dudhale

Jaysinh Mohite Patil
Pandharpur Assembly : माजी मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांना धोबीपछाड देत पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रणिती शिंदेंची मुसंडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com