Rajan Patil : राजन पाटलांची प्रथमच पीछेहाट; मोहोळमधून काँग्रेसला सर्वाधिक लीड!

Mohol Assembly Election : मोहोळचे पहिले आमदार गोविंदराव भाऊराव बुरगुटे यांच्यापासून विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यापर्यंत कायम धर्मनिरपेक्ष उमेदवाराच्या पाठीशी मोहोळची जनता राहिलेली आहे.
Rajan patil
Rajan patilSarkarnama

Solapur, 06 June : महायुतीचे सोलापूरमधील उमेदवार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्क्य देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केली होती. मात्र, झाले उलटेच. काँग्रेसकडे प्रभावशाली एकही नेता नसतानाही मोहोळमधून प्रणिती शिंदे यांना मतदारसंघात सर्वाधिक 63 हजार 152 मतांचे लीड मिळाले आहे, त्यामुळे राजन पाटील यांची मोहोळमध्ये प्रथमच पीछेहाट झाली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आशा विधानसभेसाठी पल्लवीत झाल्या आहेत.

मोहोळ (Mohol) विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना 1 लाख 28 हजार 289 मते मिळाली आहेत, तर राम सातपुते यांना 65 हजार 137 मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांना 63 हजार 152 मतांचे लीड मिळाले, ते सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांना मिळालेले सर्वाधिक मताधिक्क्य आहे. अनगर परिसरातून सातपुते यांना लीड असला तरी राजन पाटील पाठिशी असलेल्या उमेदवाराला संपूर्ण तालुक्यातून पहिल्यांदा पाठिंबा मिळू शकलेला नाही.

महायुतीच्या वतीने मोहोळ विधानसभा मतदारसंघाची सर्व सूत्रे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मोदी लाटेत 2014 मध्ये राजन पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य दिले होते. तसेच, राजन पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आणले होते, त्यामुळे राजन पाटील हे राम सातपुते यांनाही लीड मिळवून देतील, अशी अपेक्षा भाजपश्रेष्ठींना होती. तसा शब्दही पाटील यांनी भाजपला दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजन पाटील यांच्याकडे निवडणुकीची सर्व सूत्रे सोपवण्यात आल्यामुळे मोहोळ तालुक्यातील भाजपचे कट्टर कार्यकर्ते हे शांत राहिले, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या मतभेदाचा फटकाही राम सातपुते यांना बसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय भाजप नेत्यांना मराठा आरक्षणावरून सर्वाधिक विरोध याच मोहोळमध्ये झाला होता. वडवळ येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी राम सातपुते येणार होते. मात्र, तत्पूर्वीच सकल मराठा समाजाने एकत्र जमून निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे प्रचाराचा शुभारंभ दुसऱ्या ठिकाणावरून करण्याची नामुष्की भाजप नेत्यांवर आली होती.

भीमा परिवारात फूट

महायुतीच्या नेत्यांमध्ये संपूर्ण निवडणुकीत एकसूत्रता दिसली नाही. राष्ट्रवादीतील दोन गट यांच्यात नेहमीप्रमाणे अंतर दिसून आले. भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांचा भीमा परिवार पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात ताकद बाळगून आहे. मात्र, भीमा परिवारातही फूट पडली. भीमा सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी मेळावा घेतला, त्यामुळे भीमा परिवाराची ताकद असणाऱ्या गावात भाजपची पीछेहाट झाली.

Rajan patil
Pandharpur Assembly : माजी मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांना धोबीपछाड देत पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रणिती शिंदेंची मुसंडी

मराठा आरक्षण

मोहोळ मतदार संघातील पाणीप्रश्न, कांद्याचा प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. मोहोळमध्ये राम सातपुते यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे. प्रचाराला गेल्यानंतर सातपुते यांना लोक मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारत होते, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपची पुरती कोंडी झाली होती.

उत्तरमधील २४ गावे निर्णायक

मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यांतील 24 गावांतही हात जोरदार चालला. याच 24 गावांत कांदा निर्यात बंदीचा मुद्दा भाजपच्या अंगलट आलेला दिसून आला. प्रत्येक गावांत याबाबत जाब विचारण्यात आला. उत्तर सोलापूरमधील भाजप नेत्यांच्या गावातही काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना लीड मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी प्रणिती शिंदेंसाठी उत्तर सोलापूरमध्ये जोरदार काम केले.

Rajan patil
NCP Sharadchandra Pawar Party : रामकृष्ण हरी म्हणत अपक्षांचीही वाजवली तुतारी; राष्ट्रवादीने सातारा गमावला, बीड कसाबसा वाचला

मोहोळमध्ये शिवसेनेच्या पारंपारिक मतांचा गठ्ठा आहे. महाविकास आघाडीमुळे ती मते प्रणिती शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झाली. भाजपने शिवसेना फोडल्याचा राग होता, तो शिवसैनिकांनी प्रणिती शिंदे यांना मतदान करून काढला.

काँग्रेस विचाराचा तालुका

मोहोळचे पहिले आमदार गोविंदराव भाऊराव बुरगुटे यांच्यापासून विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यापर्यंत कायम धर्मनिरपेक्ष उमेदवाराच्या पाठीशी मोहोळची जनता राहिलेली आहे. मोहोळमधून बुरगुटे यांच्यानंतर शहाजीराव पाटील हे तीन वेळा निवडून आले आहेत. चंद्रकांत निंबाळकर हे दोनदा, तर तीनदा राजन पाटील यांनी मोहोळचे प्रतिनिधित्व केले आहे. लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम आणि यशवंत माने हे प्रत्येकी एक वेळा निवडून आलेले आहेत. अगदी मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेला आहे. आताही काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना भरूभरून मतदान झाले आहे.

Rajan patil
MNS-NCP Bet : सोलापुरातील विजयाची मनसे पदाधिकारी हरला पैज; शरद पवार गटाला दिला लाखाचा धनादेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com