Rajan Patil: राजन पाटलांच्या मागे भाजपने उभी केली अख्खी फौज! पण एकनाथ शिंदेंच्या एका सभेने फिरवलं वारं

Mohol Nagarparishad Election : मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपची मोठी ताकद असूनही शिवसेनेच्या 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी नगराध्यक्षपद जिंकत राजकीय उलथापालथ घडवली.
Shiv Sena’s Siddhi Vastare celebrates her mayoral victory in Mohol after defeating BJP candidate Shital Kshirsagar in a high-voltage municipal election battle.
Shiv Sena’s Siddhi Vastare celebrates her mayoral victory in Mohol after defeating BJP candidate Shital Kshirsagar in a high-voltage municipal election battle.Sarkarnama
Published on
Updated on

अनगरमधील नगरपंचायत बिनविरोध करताच माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ नगरपरिषदेत लक्ष घातलं होतं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. मोहोळचे मैदान मारण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सगळी ताकद लावली. आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, असे सगळे नेते मैदानात उतरले.

पण शिवसेनेच्या सिद्धी राजू वस्त्रे या अवघ्या 22 वर्षीय तरुणीने या सगळ्यांना चितपट करून मैदान मारले. नगराध्यक्षपदी सिद्धी या 170 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या शीतल सुशील क्षीरसागर यांचा पराभव केला. 2016 च्या मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने अवघ्या दोन जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांना घेऊन भाजपने ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे दाखवून दिले. पालकमंत्र्यांपासून जिल्ह्यातील आजी-माजी आमदार खासदारांची फौजही राजन पाटील यांच्या मदतीला दिली.

या सगळ्याचा परिपाक म्हणून 20 जागांपैकी 11 जागा जिंकून भाजपने नगरपालिका जिंकली पण नगराध्यक्षपदाच्या निवडणूक भाजपला जिंकता आली नाही. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत सिद्धी वस्त्रे या तरुणीने भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांना पराभूत केले. शिवाय शिवसेनेने 8 जागा जिंकल्या.

खरंतर सुरुवातीपासूनच मोहोळ नगर परिषदेची निवडणूक जिल्हाभर गाजली. विकासाच्या मुद्द्यापेक्षा केवळ आणि केवळ वैयक्तिक टीकाटिप्पणी प्रचारात पाहायला मिळाली. शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे यांनी सभा घेतल्या.

एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेत पंडित देशमुख यांच्या हत्याकांडाचा विषय काढून पाटील कुटुंबावर निशाणा साधला. हीच सभा या निवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली. आता याच निवडणुकीच्या निकालावरती होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची समीकरणे जुळवली जाणार आहेत.

Shiv Sena’s Siddhi Vastare celebrates her mayoral victory in Mohol after defeating BJP candidate Shital Kshirsagar in a high-voltage municipal election battle.
Chandrakant Khaire : दानवेंनी 'मातोश्री'वर गुपचूप पक्षप्रवेश उरकला; खैरेंची तळपायाची आग मस्तकात : उमेदवारीच देणार नाही म्हणत इशारा!

नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या सिद्धी शिंदे यांच्या रुपाने वस्त्रे कुटुंब 30 वर्षानंतर पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले आहे. सिद्धीचे आजोबा विश्वनाथ वस्त्रे शहरातील गवत्या मारुती चौकातील वीरभद्र देवाचे मुख्य मानकरी होते. 30 वर्षांपूर्वी मोहोळ ग्रामपंचायतचे सरपंचपदही त्यांनी भूषविले होते. वस्त्रे मोहोळच्या वेगवेगळ्या प्रभागातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.

सिद्धी सध्या एम.कॉम करत सीए फर्ममध्ये नोकरीही करत होती. मोहोळच्या राजकारणामध्ये सहभागी व्हावे, अशी कोणत्याही प्रकारची इच्छाही सिद्धीची नव्हती. मात्र, नगरपालिकेचे आरक्षण जाहीर झाले आणि समीकरण बदलली.

Shiv Sena’s Siddhi Vastare celebrates her mayoral victory in Mohol after defeating BJP candidate Shital Kshirsagar in a high-voltage municipal election battle.
Rohit Pawar Jamkhed municipal election : पराभवाचा 'ब्लेम गेम'; पवार-सपकाळ-थोरातांमध्ये रंगलाय!

सिद्धीचे चुलत भाऊ किशोर वस्त्रे व दिग्विजय वस्त्रे यांनी शिवसेनेच्या रमेश बारसकर यांच्याशी चर्चा करून सिद्धीला राजकारणात उतरवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून (Shivsena) सिद्धीला नगराध्यक्षपदाची उमेदवारीही मिळाली. निवडणुकीची सर्व यंत्रणा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, पद्माकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखली होती. शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा यामुळे नगराध्यक्ष पदाचा मोठा विजय संपादन करता आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com