Mohol Politic's : निवडणूक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उमेश पाटलांचा ‘यू टर्न’; म्हणाले, ‘मी आजही अजितदादांसोबतच’

Umesh Patil News : विधानसभा निवडणुकीत राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे, असं मी अजितदादांना निवडणुकीपूर्वीच सांगत होतो. त्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर शनिवारीच अजितदादांनी अभिनंदनाचा फोन केला होता.
Umesh Patil-Ajit Pawar
Umesh Patil-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 November : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले उमेश पाटील यांनी आज अचानक यू टर्न घेतला आहे. मी कालपर्यंत अजितदादांसोबत होतो आणि आजही अजितदादांच्या सोबतच आहे, असे मोहोळमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मोहोळमधील (Mohol) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेश पाटील यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली होती. त्यानंतर उमेश पाटील यांनीही टोकाची भूमिका घेत अजित पवारांपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता. समर्थकांनीही उमेश पाटील यांच्यावर दबाव वाढवला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजन पाटील यांना जवळ केल्यानंतर उमेश पाटील (Umesh Patil) यांनीही शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या पक्षाच्या उमेदवार (राजू खरे) निवडीपासून त्यांना निवडून आणेपर्यंत उमेश पाटील यांनी मोहोळमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उमेश पाटील यांनी भूमिका बदलली आहे.

Umesh Patil-Ajit Pawar
Maharashtra Politic's : सत्तास्थापनेच्या घडामोडीत मोठी बातमी; मुख्य सचिवांनी घेतली अजित पवारांची भेट...

उमेश पाटील म्हणाले, मोहोळमधील राजू खरे यांचा विजय हा मतदारसंघामधील सर्व कार्यकर्ते आणि सहकार्यांच्या मेहनतीचा विजय आहे. मोहोळमधील राजू खरे यांचा विजय हा मोहोळसाठी स्वातंत्र्य दिन आहे. मी कालपर्यंत अजितदादांसोबत होतो आणि आजही अजित दादांच्या सोबतच आहे.

विधानसभा निवडणुकीत राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे, असं मी अजितदादांना निवडणुकीपूर्वीच सांगत होतो. त्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर शनिवारीच (ता. 23 नोव्हेंबर) अजितदादांनी अभिनंदनाचा फोन केला होता. दादांना मी सांगत होतो की, राजन पाटलांच्या नादाला लागू नका, त्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

Umesh Patil-Ajit Pawar
Malshiras politic's : आमदारकी, आर्थिक बळ दिलं; पण मोहिते पाटलांनी भाजप कार्यकर्त्यांनाच धमक्या दिल्या; पराभवानंतर फडणवीसांचा निकटवर्तीय नेता आक्रमक

ते म्हणाले, माजी आमदार राजन पाटील हे जर तुतारीकडे गेले असते, तर मोहोळमध्ये घड्याळाचा आमदार निवडून आला असता. राजन पाटील यांच्या विरोधातला आमदार मोहोळमधून निवडून येणार होता, त्यामुळे पक्ष कुठला हे महत्वाचं नव्हतं. आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊन राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

आम्ही राज्य आणि देश स्तरावरचा कोणताही प्रश्न या निवडणुकीत घेतला नाही. आमच्या मतदारसंघात लाडकी बहीण, जरांगे पॅटर्न, ओबीसी पॅटर्न हा प्रश्नच नव्हता, तर अन्यायाच्या विरोधात जाऊन ही निवडणूक झाली होती, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com