Jayant Patil on CM : एकनाथ शिंदेंना लोकांची जादा पसंती, भाजप नेत्यांनी विचार करावा : जयंत पाटलांनी डिवचले

महाविकास आघाडीपुढे त्यांचा टिकाव लागणार नाही.
 Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व्हे केला आहे. एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा आहे, तर भाजपने याचा विचार करावा. पण, महाविकास आघाडीपुढे त्यांचा टिकाव लागणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली. (More support for Eknath Shinde, BJP should think: Jayant Patil)

सांगली (Sangli) जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी वाढत्या गुन्हेगाराचा त्यांनी आढावा घेत कडक भूमिका घ्या, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेबाबत भाष्य केले.

 Jayant Patil
Baramati News : अखेर ठरलं…कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बारामती येणार; अहिल्यादेवी होळकर जयंती दणक्यात साजरी होणार

शिवसेनेच्या वतीने राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना २६.१ टक्के लोकांनी पसंती दिल्याचे दर्शविण्यात आले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यावरून भाजपकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत. त्या एकाच पॅटर्ननुसार होत आहेत. जिथे विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत. विरोधकांची ताकद दाबण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

 Jayant Patil
Patole On Shivsena Advt : फडणवीसांचा एवढा अपमान शिंदे करतील, असं वाटलं नव्हतं; काँग्रेसनं उपमुख्यमंत्र्यांच्या जखमेवर मीठ चोळले

ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत. कोल्हापूर, नाशिक, नगर येथील दंगली पाहिल्यानंतर त्याबद्दल शंका येऊ लागते. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची मांडणी अतिशय घट्ट आहे, अशा ठिकाणी दंगल होते, हे शंकास्पद आहे. गृहमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवावी. आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला तयार आहोत. समाज माध्यमातील फेक अकाउंट बाबत गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

 Jayant Patil
Dispute in BJP-Shivsena : शंभर आमदारांचा भाजप ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ स्वीकारणार का?; फडणवीसांचे काय होणार

ब्रिटीशांनीसुद्धा वारकऱ्यांना अशी वागणूक दिली नव्हती

वारकऱ्यांवर ३०० वर्षात कधीही लाठीचार्ज झाला नव्हता. यापूर्वी ब्रिटिशांनीसुद्धा अशी वागणूक वारकऱ्यांना दिली नव्हती. विठ्ठल भक्तीत लीन होऊन शांततेच्या मार्गाने जाणाऱ्या संप्रदायाबाबत कधीही असा प्रकार झाला नव्हता. ही घटना निषेधार्ह आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com