जयंतरावांना विश्वजित कदम, विशाल पाटील, बाबर, घोरपडे आव्हान देणार का?

जयंत पाटील यांना बँकेवर पकड कायम राहील का हे निवडणुकीनंतर ठरेल. त्यांच्याविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Jayant patil
Jayant patilSarkarnama
Published on: 
Updated on: 

सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका दिवाळीनंतर उडणार आहे. चार राजकीय पक्षांनी दारूगोळा जमा केला आहे. भाजप-शिवसेनेने स्वबळाचा बार उडवण्याची घोषणा केली आहे, तर बँकेवरील पकड कायम ठेवून बिनविरोधचा धमाका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे डावपेच सुरु आहेत. जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ आणि त्याची बेरीज ते कशी जमवतात, यावर निवडणुकीचे चित्र ठरेल. निवडणूक झालीच तर संचालकांशी संबंधित साडेपाचशे कोटींची कर्जे हाच मुद्दा गाजणार आहे. (Movements of all party panels against Jayant Patil in Sangli District Bank)

जिल्हा बँकेत साधारण ४० वर्षांपूर्वी सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्याकडे बँकेचे नेतृत्व होते. वसंतदादांनी त्यांच्याकडे धुरा सोपवली होती. तो काळ बँकेत राजकारण नाही, असा होता. काळानुरुप बँकही राजकारणाचा अड्डा झाली आणि आज त्याचे स्वरुप आपण अनुभवत आहोत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केले. या काळात सारे काही शांत असताना ‘केन ॲग्रो’च्या कर्जप्रकरणावरून बँकेतील संघर्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आला. एनपीएच्या उंबरठ्यावरील कर्जे हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. सुमारे साडेपाचशे कोटींची कर्जे संचालकांशी संबंधित संस्थांची आहेत. त्यामुळे संघर्ष टाळून बिनविरोधसाठी सर्वजण एकत्रित येतील असे चित्र आहे.

Jayant patil
अजित पवार म्हणाले होते, ‘मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे...अन्‌ सभासदांनी ते खरे करून दाखवले!

एकूण २१ जागासाठी ही निवडणूक होत आहे. पूर्वीचीच मंडळी इच्छुक असली तरी नव्याने काही वजनदार मंडळी बँकेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. राजकीय पक्षानुसार बलाबल पाहिले तर राष्ट्रवादीचे १२, कॉंग्रेसचे सहा, भाजप दोन आणि शिवसेना एक असे चित्र आहे. कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. तशातच चारही पक्षात इच्छुक वाढलेत. त्यामुळे बँकेत विद्यमान काही संचालकांसह नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. जवळपास ७० टक्के जुनी मंडळी असतील, तर ३० टक्के नवे चेहरे असतील.

Jayant patil
अजितदादांची विक्रमी कामगिरी : ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादीचे सहा जण १६ हजारांच्या फरकाने विजयी

जयंत पाटील यांना बँकेवर पकड कायम राहील का हे निवडणुकीनंतर ठरेल. त्यांच्याविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, खासदार संजय पाटील, विशाल पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याही भूमिका निर्णायक असतील. आठवडाभरात अंतिम चित्र कळेल. संस्थात्मक बांधणीवरच या निवडणुकीचे यश ठरते. विद्यमान काही संचालकांनी ती जुळणी आधीच केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत जागा वाटपावर पुढचे चित्र ठरणार आहे. जयंतरावांकडून सर्वांसोबत चर्चा आणि व्यूहरचना सुरु आहे. निवडणूक लागली तरी काही चेहरे कायमच असतील, असे दिसते. जयंत पाटील ‘वेट ॲन्ड वॉच’ भूमिकेत दिसतात.

दिवाळीनंतर घडामोडी गतीमान होणार

अर्ज भरण्यास आजपासून सुरवात झाली आहे, तर माघारीसाठी ९ नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. त्यामुळे जवळपास २५ दिवस हे खलबतांसाठीच आहेत. दिवाळीनंतरच घडामोडी गतीमान होतील असे दिसते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे काहींनी साकडे घातले आहे. त्यामुळे ही निवडणूक जिल्ह्यापुरती सिमित राहिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.