
Kolhapur News : ठाकरेंच्या सेनेनं पहिल्यांदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उडायचं मनात आणलं पाहिजे आणि तसं असलं तरी प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. या कृतीलाच खिळं मारण्याचे काम आजूबाजूची जी लोकं करताना दिसत आहेत. ही लोकं नेमकं महाराष्ट्रात आणि देशात काय संदेश देतात हे पाहिलं पाहिजे. संजय राऊत यांचं देशाबद्दल नेमकं काय व्हिजन आहे? त्यांची रोज वैचारिक दिवाळखोरी समोर येत आहे. अशा लोकांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कसे थांबवणार आहेत? पक्ष उभारी कशी घेणार? पक्षांमध्ये असणाऱ्या याच सगळ्या मंडळींमुळे नाराज होऊन आमच्या नेत्यांनी वेगळ्या पक्षाची भूमिका घेतली. जी माझ्यासह अनेक मंडळींनी स्वीकारली. मात्र राऊत यांना कुठेही पायबंद घालण्याचे काम नेतृत्वाकडून अजूनही होत नसल्याची टीका खासदार धैर्यशील माने यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते.
लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा महायुती एक संघपणे निवडणूक लढवेल. ज्या त्या जिल्ह्याच्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेण्यात येतील. कार्यकर्त्यांची मानसिकता लक्षात घेऊन काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती तर काही ठिकाणी एकत्रित महायुती निवडणूक लढवणार असल्याची माहिती खासदार माने त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघाबाबत बोलताना, 2005 पासून अलमट्टीच्या पूराचा फटका बसत आहे. त्यामुळे अलमट्टीचे योग्य पद्धतीने निरीक्षण झाले पाहिजे. आत्तापर्यंतचे एकतर्फी अहवाल गेलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने सुद्धा याप्रकरणी गंभीर्याने निर्णय घेतले पाहिजे. हे पुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. तसेच अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी मी स्वतः सी.आर. पाटील यांच्यासोबत बोललो आहे.
आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यानेच आमच्या जिल्ह्याला पुराचा फटका बसत असल्याचेही स्पष्ट पाटील यांना सांगितल्याचे ते म्हणाले. तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात येणारा पूर हा मानवनिर्मित संकट आहे. दोन राज्यांच्या समन्वयाने यावर तोगडा काढण्याची गरज असून यासाठी वेळापत्रक तयार करायला हवं. तसेच शास्त्रशुद्ध अहवाल तयार करून केंद्राकडे द्यायला हवा. कोर्टात थर्ड पार्टी म्हणून आपलं मत नोंदवावं यासाठी महाराष्ट्र शासनाने पाऊल टाकावीत, असे त्यांनी सांगितलं आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून बोलताना माने म्हणाले, राज्याचे तिन्ही नेते याच्यावर निर्णय घेतील. यात स्थानिक पातळीवरचे राजकारण चालणार नाही. तिन्ही नेते समन्वयाने याचा निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी याप्रकरणी एकमेकांवर चिखल फेक करणे योग्य नाही. महायुतीचे हाणन होऊ नये याची खबरदारी घटक पक्षाने देखील घेतली पाहिजे, असेही खासदार माने म्हणाले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रभावित होऊन मी या पक्षात आलो. त्यावेळी एकनाथ शिंदे हे एकमेव नेतृत्व होतं. जे महाराष्ट्राला योग्य दिशा देणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व खासदारांनी त्यांच्या पाठी उभे राहण्याचे ठरविलं आहे. विकास कामासाठी आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो आहोत.
नेतृत्वाचा डायलॉग तुटला तर खऱ्या अर्थानं पक्षात ताटातूट सुरू होते. एकनाथ शिंदे हे नेहमीच उपलब्ध असणारे आणि ॲक्सेसिबल असणारी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत थेट डायलॉग आणि कामाचा डायरेक्ट निपटारा करता येतो. जे आमच्यासाठी फायदेशीर ठरलं आहे. पूर्वीच्या नेतृत्वाचं काय चुकलं हे सांगणे इतपत मी मोठा नाही. त्यांनी त्याचे आत्मपरीक्षण विधानसभेच्या निवडणुकीनंतर निश्चित केले असणार, असा टोलाही खासदार माने यांनी यावेळी लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात करेक्ट समन्वय आहे. त्यांच्या एकमेकांच्या डायलॉग मधूनच सरकार चालत असतं. राज्य शासनाने यामध्ये जे निर्णय घेतले त्यामध्ये या तिघांचाही सहभाग आहे.
सगळ्यांच्या एकमताने निर्णय होऊनच महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला एवढा मोठा दिलेला आहे. इथं सत्तेची आता स्पर्धा राहिलेली नाही. प्रत्येकाला आपापला कोटा आणि वाटा आहे. त्यामुळे एकमेकांच्या ताटात वाकून बघण्याचा प्रश्न येत नाही. रेशो ठरलेले आहेत. प्रत्येक माणसाला समाधान करण्याचा प्रयत्न तिघेही करत आहेत. विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन तिन्ही नेते कामात आहेत. निश्चितच पॉलिटिकल चिखल फेक काही प्रमाणात होत राहील. पण त्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होणार नसल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.