Phaltan : पालखी मार्ग सुशोभीकरण; खासदार निंबाळकरांचे मंत्री गडकरींना साकडे

Ranjitsinh Naik Nimbalkar या मागणीचा सकारात्मक विचार करून, लवकरच निधी दिला जाईल, असे आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे.
MP Ranjitsinh Naik Nimbalkar, Nitin Gadkari
MP Ranjitsinh Naik Nimbalkar, Nitin GadkariKiran Bole, Phaltan

Phaltan News : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण शहरात ज्या मार्गावरुन आगमन व प्रस्थान करतो, त्या पालखी मार्गाच्या नियोजनपूर्वक सुशोभीकरणासाठी ८० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक विचार करुन निधी देऊ असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ, महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी तसेच प्राचीन व ऐतिहासिक शहर म्हणुन फलटण प्रसिद्ध आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, मध्य ठिकाण म्हणूनही फलटणकडे पाहिले जाते.

केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हातात घेतले असून ते वेगाने चालू आहे. त्यामुळे फलटण शहराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु हा महामार्ग शहराच्या बाहेरून जात असल्याने फलटण शहरांतर्गत पालखी महामार्गाचे डी. पी. आर मध्ये समाविष्ट करण्यासह सुशोभीकरणासाठी ८० कोटी रुपयांच्या निधी मंजुर व्हावा.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar, Nitin Gadkari
Satara News : शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; विकासकामांना १२ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर

फलटणमधील पालखी महामार्गावरील मलठण, उंबरेश्वर चौक, पाचबत्ती चौक, श्रीराम मंदिर, गजानन चौक, महात्मा फुले चौक, श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते गिरवी नाका व विमानतळ व रिंग रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डीएड चौक, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मार्ग या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी अंदाजे ८० कोटी रुपये मंजूर करावेत.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar, Nitin Gadkari
Phaltan : दिंगबर आगवणेंसह सात जणांवर मोक्काची कारवाई

फलटणमधील सर्वच ठिकाणी विविध विकास कामे करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, या मागणीचा सकारात्मक विचार करून, लवकरच निधी दिला जाईल, असे आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar, Nitin Gadkari
Satara : साखर कारखानदारीला उभारी द्या : शिवेंद्रराजेंनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्र्यांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com