Shinde Send Notice to Gore : प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना नोटीस : सात दिवसात माफी मागा; अन्यथा...

Solapur Political News : अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्यांप्रकरणी खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना कायदेशीर नोटीस पाठवत माफीची मागणी केली आहे.
Praniti Shinde-Jaykumar Gore
Praniti Shinde-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 May : सातत्याने अपमानास्पद, बदनामीकारक आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे, मानहानीकारक विधाने करणे आणि स्त्रीत्वाचा अपमान केल्याप्रकरणी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नोटीस मिळाल्यापासून जयकुमार गोरे (Jaykumar Gore)यांनी सात दिवसांत माफी मागावी; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही या नोटिशीतून देण्यात आलेला आहे. खासदार शिंदे यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. आर्या राजेभोसले यांच्या माध्यमातून गोरे यांना ही कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

सोलापुरात ८ मे २०२६ रोजी माध्यमांशी बोलताना गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष्य करून एक विधान केले होते. प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना सोलापूरमधील विकासापेक्षा फक्त दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडेच लक्ष केंद्रित करतात, असा त्या विधानाचा सूर होता. त्यांच्या द्वयर्थी विधानामुळे शिंदे यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोचली असून त्या विधानाचा हेतू कलुषित होता. त्यातून खासदारांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न होता, असे ॲड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

नोटिशीमध्ये म्हटले आहे की, गोरे यांनी टीकेची मर्यादा ओलांडून प्रणिती शिंदे यांना वैयक्तिक दूषणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या अनेक अपमानास्पद विधानांनकडे शिंदे यांनी दुर्लक्ष केले. परंतु, गोरेंची इतरांबद्दल बोलण्याची असंस्कृत पद्धती आणि विशेषतः महिलांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन दूषित आहे. म्हणूनच प्रणिती शिंदे यांनी गोरेंच्या या असंवेदनशील आणि बेजबाबदार सार्वजनिक वर्तनाबाबत कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

जयकुमार गोरे यांच्या काही विधानाचा दाखलाही या नोटिशीमध्ये देण्यात आलेला आहे. त्यांचे वर्तन, देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव हे नेहमीच उद्धट, अनादरयुक्त आणि असंस्कृत राहिलेले आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांना सार्वजनिकरित्या अपमानित करण्याचा त्यांचा जाणीवपूर्वक हेतू अनेक व्हिडिओमधून दिसून येतो. त्यांची विधाने ही ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ गैरवापर आहेत, असेही त्यात म्हटले आहे.

Praniti Shinde-Jaykumar Gore
Pawar on Patel, Tatkare : पटेल, तटकरेंमध्ये काय कर्तृत्व आहे, याची मला कल्पना आहे : पवारांनी सांगितले राजकारणातील दोघांचे महत्व...

जयकुमार गोरे यांची बोलण्याची शैली ही आत्मकेंद्री, वर्चस्ववादी आणि हेराफेरीपूर्ण आहे, त्यामुळे ते इतरांना कमी लेखून स्वतःला सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. हे करताना ते इतरांच्या कामगिरीला कमी लेखण्याची एक ठराविक वागणूक प्रक्रिया त्यांचा स्थायीभाव झालेला आहे. राजकारणातील महिलांप्रती सभ्यता, शिष्टाचार आणि नम्रता राखण्याच्या त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेऊन गोरे हे स्वतःमध्ये सुधारणा करतील, अशी आशाही प्रणिती शिंदे यांनी नोटिशीमधून बोलून दाखवली आहे.

संविधानातील तत्त्वांचेही जयकुमार गोरे यांच्याकडून उल्लंघन झालेले आहे. प्रणिती शिंदे यांच्याबद्दल सततचा आकस आणि दुर्भावना ठेऊन काम करणे यातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचे उल्लंघन केले आहे, असेही त्या नोटिशीत म्हटलेले आहे.

Praniti Shinde-Jaykumar Gore
Nitin Gadkari : सोलापूर दौऱ्यात नितीन गडकरींचा महत्वपूर्ण निर्णय : हेलिकॉप्टर प्रवास रद्द करत चारचाकीने अक्कलकोटला रवाना

नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांची बिनशर्त माफी मागावी. ती माध्यमांमध्ये प्रकाशित करावी. शिंदे आणि सर्वसाधारण महिलांविरुद्ध यापुढे अपमानास्पद किंवा बदनामीकारक विधाने करणे थांबवावे; अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय उरणार नाही, असा इशाराही खासदार शिंदे यांनी गोरे यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com