Shrikant Shinde News : खासदार श्रीकांत शिंदेंनी न राहून ठाकरेंना चिमटा काढलाच; म्हणाले...

Political News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या तरुणांना महायुतीतील शिवसेनेकडून संधी दिली जाईल, असे देखील खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
Shrikanat Shinde
Shrikanat Shinde Sarakarnama
Published on
Updated on

Sangali News : आगामी काळात होता असलेली विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने महायुती व महाविकास आघाडीकडून जागावाटपाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडली जात नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikanat Shinde) सध्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. इस्लामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्याप्रसंगी बोलताना खासदार श्रीकांत शिंदेंनी महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदावरून टोला लगावला आहे. (Shrikanat Shinde News)

महाविकास आघाडीमध्ये आज प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे आहे, भर सभेत आपले नाव जाहीर करा, असे सांगितले जात आहे, अशा शब्दांत शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव ना घेता टीका केली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.

महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेची धडकी भरली आहे. लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू घसरली आहे, अशी टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी केली. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या तरुणांना महायुतीतील शिवसेनेकडून संधी दिली जाईल, असे देखील खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Shrikanat Shinde
Ajit Pawar : अजितदादा तिघांना पाठवणार विधान परिषदेत; ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

विरोधकांच्याकडे आता काही उरलं नाही, केवळ खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा नियोजन सुरू आहे. केवळ त्यांच्याकडून राज्य सरकारच्या कारभारावर आरोप केले जात आहेत, असे देखील आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी या वेळी केला.

Shrikanat Shinde
Latur Political News : लोकसभा निवडणुकीत गेलेली पत `जन सन्मान यात्रा` निलंगेकरांना मिळवून देणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com