Jawali News: उदयनराजेंनी घातले जावलीत लक्ष; आमदार गट अस्वस्थ...

Udayanraje Bhosale: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि सध्या सुरु असलेली बाजार समितीची निवडणूक या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी जावळीत लक्ष घातले आहे.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांच्या जावळी मतदारसंघात खासदार उदयनराजेंनी Udayanraje Bhosale लक्ष घातले असून अलिकडे त्यांचे जावळी तालुक्यातील दौरे वाढले आहेत. बाजार समिती आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी जावळीत वाढविलेला संपर्क शिवेंद्रसिंहराजे व राष्ट्रवादीला अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

उदयनराजेंना सातारा लोकसभेचे खासदार व्हायचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु असून भाजपनेही यावेळेस कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार निवडून आणण्यासाठी बांधणी सुरु केलेली आहे.

आगामी काळात होणाऱ्या विविध राज्यांतील लोकसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजेंवर काही राज्यांची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उदयनराजेंनी आपले प्रभावक्षेत्र अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी सातारा जावळी मतदारसंघापासून सुरवात केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि सध्या सुरु असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी जावळीत लक्ष घातले आहे. त्याचे या तालुक्यातील दौरे वाढले आहेत. जावळी तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे प्रभाव क्षेत्र आहे. पण, येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची होणारी घुसमट ओळखून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण सुरु केले आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale Meets Amit Shah: दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शाहांची भेट

यानिमित्ताने मध्यंतरी अमित कदम यांना पक्षात घेऊन जावळी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकत वाढविण्यास सुरवात केली आहे. एकुणच आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या सातारा, जावली मतदारसंघात राष्ट्रवादीसह उदयनराजेंनीही लक्ष घातल्याने आगामी निवडणूकांत आमदार गटाला झुंजावे लागण्याची शक्यता आहे.

उदयनराजेंनी जावळी तालुक्यातील पिंपळेश्वर यात्रेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा केली होती. तसेच परळी खोऱ्यातील आंबळेच्या यात्रेतील कार्यक्रमात सहभागी होत तलवार उंचावत वाकड्या नजरेने बघू नका, असा सूचक इशारा दिला होता. जावळी तालुक्यात वाढलेले उदयनराजेंचे दौरे विरोधकांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com